जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती सप्ताह राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:31 AM2021-03-23T04:31:08+5:302021-03-23T04:31:08+5:30

गोंदिया : प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून त्याची सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता ...

Awareness week will be implemented in the district on the occasion of World Water Day | जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती सप्ताह राबविणार

जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती सप्ताह राबविणार

googlenewsNext

गोंदिया : प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून त्याची सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सोमवार, २२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात २२ ते २७ मार्च या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुढे म्हणाले, दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. त्या अनुषंगाने पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. यासाठी पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदींबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर २२ ते २७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान हे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश राठोड यांनी केले आहे.

.....

या कार्यक्रमांचे करणार आयोजन

या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी जिल्हास्तरावर वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये राज्यस्तरावरून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील नियोजन बैठकीमध्ये जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शुभारंभ व जल प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजिटल माध्यमांचा वापर करून समजावून सांगणे, २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दूषित आलेल्या स्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल व २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शून्य गळती मोहीम, नादुरुस्त स्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

Web Title: Awareness week will be implemented in the district on the occasion of World Water Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.