आयुर्वेदिक दवाखाना डॉक्टरविना झाला पोरका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:00 AM2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:06+5:30
४ हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोंडगावदेवी गावात आज घडीला आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. लाखो रुपये वेळोवेळी खर्चून सुसज्ज केलेली दवाखान्याची ईमारत डॉक्टर व कर्मचाऱ्यांविना पोरकी होऊन कुलूपबंद अस्थेत आहे.काही वर्षापूर्वी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी तब्बल १२ वर्षापासून सेवा दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे. कोणताही नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही. समस्त जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन स्तरावरुन विविध योजना राबवित येत आहे. मात्र दुसरीकडे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा मनुष्यबळाअभावी कुचकामी ठरत आहे.
येथील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्यात मागील काही वर्षांपासून डॉक्टर व परिचर कायमस्वरुपी नसल्याने सध्या दवाखाना कुलूपबंद आहे. परिसरातील सामान्य जनता आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहे. कर्मचारी भटकत नसल्याने हा दवाखाना डॉक्टरविना ‘पोरका’ झाल्याचे चित्र आहे.
स्थानिक व परिसरातील विहिरगाव, देऊळगाव, बोदरा इत्यादी गावांसाठी येथील आयुर्वेदिक दवाखाना सोयीस्कर होता. यापूर्वी सदर दवाखान्यात प्रशिक्षित डॉक्टरांची नियुक्ती होत असल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला नि:शुल्क आरोग्य सेवेचा लाभ मिळणे सहज शक्य होते. दवाखान्यात बºयाचपैकी बाह्यरुग्णांची नोंद होत होती.
४ हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोंडगावदेवी गावात आज घडीला आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. लाखो रुपये वेळोवेळी खर्चून सुसज्ज केलेली दवाखान्याची ईमारत डॉक्टर व कर्मचाऱ्यांविना पोरकी होऊन कुलूपबंद अस्थेत आहे.काही वर्षापूर्वी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी तब्बल १२ वर्षापासून सेवा दिली.
या दवाखान्यात नियुक्त असलेले डॉ.कुलसुंगे मागील ४ वर्षापासून चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार सांभाळण्यासाठी त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून येथील जि.प.आयुर्वेदिक दवाखान्याला अवकळा आली. बºयाच कालावधीनंतर डॉ. मेघना मांढरे या २२ जुलै २०१९ रोजी रुजू झाल्या. परंतु त्यांचा मन ईथे रमले नाही. अखेर २६ आॅगस्ट २०१९ रोजी त्यांनी आपल्या सोयीनुसार बदली करुन घेतली. तेव्हापासून या दवाखान्यावर अवकाळा आली आहे.
लोकप्रतिनिधी उदासीन
येथील जि.प.आयुर्वेदिक दवाखान्यात प्रशिक्षीत तज्ज्ञ अशा वैद्यकीय अधिकाºयाची व आवश्यक कर्मचाºयांची उणीव दूर करुन डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडत आहे. सामान्य जनतेला नित्यनेम आवश्यक असलेली आरोग्य सेवा पूर्ण:त रखडली आहे. परिणामी परिसरातील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
डॉक्टरांची नियुक्ती करा
स्थानिक जि.प.आयुर्वेदिक दवाखान्यात रिक्त असलेले वैद्यकीय अधिकाºयांचे पद विनाविलंब भरुन ग्रामस्थांनी आरोग्य सेवेचा लाभ द्या असा ठराव ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे यांनी मासीक सभेत मांडून समंत केला. ठरावाच्या अनुषंगाने संबंधीतांकडे पाठपुरावा करण्यात यावा असा मुद्दा उचलून धरण्यात आला. स्थानिक व परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेचा विचार करता आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टरांची विनानिलंब नियुक्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.