बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी अमूल्य योगदान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:46+5:302021-08-22T04:31:46+5:30
खातिया : भारतीय बौध्द महासभा केंद्र आणि राज्याने दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने प्रवचन मालिका करण्यात येत असते. भगवान बुध्दाचे पंचशील ...
खातिया : भारतीय बौध्द महासभा केंद्र आणि राज्याने दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने प्रवचन मालिका करण्यात येत असते. भगवान बुध्दाचे पंचशील व अष्टांगीक मार्गाचे पालन करुन आपण आपले जीवन सुखमय करु शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी अमूल्य असे योगदान होते असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष एन.एल.मेश्राम यांनी केले.
कामठा,नवरगाव सर्कल येथे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. महासचिव बी.बी.बन्सोड, सर्कल कामठा ग्राम शाखा अध्यक्ष आशा डोंगरे, तालुका उपाध्यक्ष मनोहर भावे, विजय मेश्राम, मयाराम गजभिये उपस्थित होते. तथागत भगवान बुध्द व बोधीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन दिप प्रज्वलीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष देवाराम मेश्राम, केंद्रीय शिक्षक अरविंद सूर्यवंशी, सर्कलचे अध्यक्ष ओमकार उके, उपाध्यक्ष बाबुलाल गडपायले, मुंडीपार सर्कलचे महासचिव अजय गजभिये, बोधाचार्य तुलसीदास मेश्राम, महासचिव नवरगाव सर्कल हेमराज चंद्रिकापुरे उपस्थित होते. यावेळी सर्व बौध्द उपासक, उपासीका वर्षावासाचे महत्व समजाऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तालुक्याचे महासचिव कोमलकुमार नंदागवळी यांनी केले तर आभार चंद्रिकापुरे यांनी मानले.