बाबासाहेबांमुळेच बौद्ध धम्म भारतात वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:18+5:30
लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने धम्मगिरी येथे रविवारी आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन म्यानमारचे भदंत डॉ. यु. चंद्रामुनी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे चंद्ररतन थेरो, तपस्वी थेरो, नागसेव बोधी, श्रद्धाबोधी थेरो, गुजरातचे प्रज्ञारत्न डॉ. जीवक थेरो, भदंत धम्मशिखर, भंते अनिरुद्ध, भंते महेंद्र भंते, धम्मतप, डॉ. बुद्धरत्न महाथेरो व भिख्खु संघ उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : भारताबाहेरील थायलंड, म्यानमार, श्रीलंका, चीन, जपान अशा अनेक देशांत बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. मात्र त्याप्रमाणात भारतात या धम्माचा प्रसार झाला नव्हता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या प्रमुख धर्माचा अभ्यास करुन समता व आचरणावर आधारित वैज्ञानिक धम्माचा स्विकार केला. त्यामुळेच भारतात नसलेला धम्म बाबासाहेबांमुळे भारतात सर्वत्र पसरला असे प्रतिपादन भदंत डॉ.डी.रेवत महाथेरो यांनी केले.
येथील लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने धम्मगिरी येथे रविवारी आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन म्यानमारचे भदंत डॉ. यु. चंद्रामुनी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे चंद्ररतन थेरो, तपस्वी थेरो, नागसेव बोधी, श्रद्धाबोधी थेरो, गुजरातचे प्रज्ञारत्न डॉ. जीवक थेरो, भदंत धम्मशिखर, भंते अनिरुद्ध, भंते महेंद्र भंते, धम्मतप, डॉ. बुद्धरत्न महाथेरो व भिख्खु संघ उपस्थित होते.
तर दुसऱ्या सत्रात धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चंद्रबोधी पाटील होते. मुख्य मार्गदर्शक डॉ. रमेश राठोड, तनुजा नेपाळे व प्रमुख पाहुणे म्हणून बालेश्वर चौरे, कुवर रामटेके, इंजि. आर. एन. रावते, भरत वाघमारे, समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, संस्थापक सचिव यादव मेश्राम, वैशाली खोब्रागडे, राजभूषण मेश्राम, महेंद्र मेश्राम, राजकुमार वंजारी, रजनी रामटेके, ज्योती तागडे, एल.एच. बन्सोड, नरेश शेंडे, सुनील गजभिये, रामेश्वर श्यामकुंवर, चिंकेश शेंडे, अनुप गडपांडे, राकेश रामटेके, मुनेश्वर मेश्राम उपस्थित होते.
यावेळी ‘मानवी कल्याणासाठी वैज्ञानिक बुद्ध धम्माची गरज’ या विषयावर डॉ. राठोड यांनी तर नेपाळे यांनी ‘धम्म संस्कारात महिलांची भूमिका’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. संमेलनादरम्यान नि:शुल्क आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. मेंढे, डॉ. मोहन, डॉ. संदीप आंबेडकर, डॉ. दीक्षीत, डॉ. संतोष येवले, डॉ. अक्षय बोरकर, डॉ. नेहा बोरकर, डॉ. साहू, डॉ. कटरे, डॉ. निर्मला साहू, डॉ. गंधे, डॉ. धमेंद्र टेंभरे यांनी रुग्णांची तपासणी करुन उपचार केला.
उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन दिलीप मून व राकेश रामटेके यांनी केले. आभार प्रशांत रावते यांनी मानले. तर धम्म परिषदेचे संचालन प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे व प्रा. मिलींद रंगारी यांनी केले. आभार प्रफुल शिंगाडे यांनी मानले. संमेलनात विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेश व जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनुप गडपांडे, राकेश रामटेके, मुनेश्वर मेश्राम, समितीचे सर्व सदस्य, भीम गर्जना संघटनेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सेवक, धम्मगिरी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी सहकार्य केले.