बाबासाहेबांनी प्रत्येकाला न्याय मिळवून दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:47 PM2019-01-25T22:47:19+5:302019-01-25T22:47:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेला नष्ट केले. या देशातील प्रत्येक व्यक्ती समान आहे त्यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि सन्मान मिळवून दिला,....
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेला नष्ट केले. या देशातील प्रत्येक व्यक्ती समान आहे त्यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि सन्मान मिळवून दिला, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने आयोजित आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात १४ जानेवारी रोजी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, आमदार संजय पुराम, माजी आ. दिलीप बन्सोड, डॉ. मोहनलाल पाटील, माजी आ. रामरतनबापू राऊत, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स. सभापती वंदना बोरकर, उपसभापती दिलीप वाघमारे, जयप्रकाश शिवणकर, नागपूरचे नितीन गजभिये, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, सुखराम फुंडे, प्राचार्य महेंद्र मेश्राम, पं.स. सदस्य छबू उके, रतन वासनिक, अॅड. एस.डी. बागडे, महेंद्र मडामे, उत्तम नंदेश्वर, समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, संस्थापक सचिव यादव मेश्राम उपस्थित होते.
यावेळी आ. पुराम, माजी आ. बंसोड, रामरतन राऊत, नरेश माहेश्वरी व विश्वजीत डोंगरे यांनी समायोचित मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक यादव मेश्राम यांनी मांडले. संचालन रमण हुमे व राकेश रामटेके यांनी केले. आभार जनार्धन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी, भीम गर्जना संघटनेचे पदाधिकारी, भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारी व समाजाच्या सर्व संघटना व समाज बांधवांनी सहकार्य केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमात समितीच्यावतीने समितीचे संस्थापक सचिव यादव मेश्राम, रायपूरचे महेंद्र मडामे, बुद्धमूर्ति विक्रेत्या हिरण राऊत, रंजिता सुरेंद्र खोब्रागडे यांचा तसेच दिवंगत बोधनदास रामटेके यांच्या स्मृतित १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत बौद्ध समाजातील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, ‘भगवान बुद्ध व त्यांचा धम्म’ हे पुस्तक व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.