दलितांचेच नाही तर सर्व दीनदुबळ्यांचे कैवारी होते बाबासाहेब ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:45+5:302021-09-08T04:34:45+5:30
खातिया : दलितांना समाजात मानाचे स्थान आज बाबसाहेबांमुळेच मिळाले आहे. असे असतानाही डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे दलितांचेच नव्हे ...
खातिया : दलितांना समाजात मानाचे स्थान आज बाबसाहेबांमुळेच मिळाले आहे. असे असतानाही डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे दलितांचेच नव्हे तर सर्व दीनदुबळ्या समाजाचे कैवारी होते, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष एन. एल. मेश्राम यांनी केले.
तालुक्यातील ग्राम पांजरा येथील बुद्धविहारात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास अंतर्गत ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर सोमवारी (दि. ६) आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी महासभेचे कामठा अध्यक्ष योगीराज वंजारी, महासचिव कोमलकुमार नंदागवळी, उपाध्यक्ष मनोहर भावे, जितेंद्र मेश्राम, कार्यालयीन सचिव विजय मेश्राम, मयाराम गजभिये, महिला उपाध्यक्ष अस्मिता उके, विजय गडपायले, रंजित बन्सोड, तेजराम गडपायले, सजन गणवीर, बबिता रामटेके, देवेंद्र खोब्रागडे, नंदकिशोर गोंडाणे, चंद्रमा गणवीर, सुशीला गणवीर, सुलोचना गणवीर, पंचफुल बन्सोड, रंजना गणवीर, तारा बन्सोड, संतोष उके, भोजराज गडपायले आदी बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संचालन महासचिव नंदागवळी यांनी केले.