जिल्ह्यात आजही जपतात बाबासाहेबांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:55 AM2018-04-14T00:55:41+5:302018-04-14T00:55:41+5:30

जगाच्या इतिहासात प्रमुख सात विद्वानांपैकी एक, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आणि विश्वभूषण, भारतरत्न, क्रांतिसूर्य व भारत भाग्यविधाता अशा विविध संबोधनांनी ओळखल्या जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६४ वर्षांपूर्वी या जिल्ह्याचे खासदार होणार होते.

Babasaheb's memories are still alive in the district | जिल्ह्यात आजही जपतात बाबासाहेबांच्या आठवणी

जिल्ह्यात आजही जपतात बाबासाहेबांच्या आठवणी

Next
ठळक मुद्देमहामानवाचे ऋणानुबंध : भविष्य केंद्रीत दृष्टीचा वैज्ञानिक विचारवंत

देवानंद शहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जगाच्या इतिहासात प्रमुख सात विद्वानांपैकी एक, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आणि विश्वभूषण, भारतरत्न, क्रांतिसूर्य व भारत भाग्यविधाता अशा विविध संबोधनांनी ओळखल्या जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६४ वर्षांपूर्वी या जिल्ह्याचे खासदार होणार होते. पण नियतीच्या चक्रात ते भाग्य या जिल्ह्यातील नागरिकांना लाभले नाही. मात्र त्या काळात बाबासाहेबांशी निगडीत जपलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणी आजही काही जुन्या मंडळींच्या स्मरणात आहेत.
ज्यांना अख्ख्या जगात ‘सिम्बॉल आॅफ नॉलेज’ असे संबोधिले जाते त्यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. अशा महामानवाचा गोंदिया-भंडारा जिल्ह्याशी काय ऋणानुबंध आहे. याची कल्पना कदाचित आजच्या नवीन पिढीला नसेल. पण भारतीय संविधानाचे जनक असलेल्या डॉ.बाबासाहेबांचे पावन पदस्पर्श गोंदिया-भंडारा जिल्ह्याला (तत्कालीन भंडारा जिल्हा) दोन वेळा झाल्याचे सांगितले जाते. क्रांतिकारी व विद्रोही व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणाऱ्या डॉ.आंबेडकरांनी निवडणुकीच्या वेळी या जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. गोंदियात ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यांना त्यावेळचे विश्रामगृहाचे खानसामा हुसन चैतू डोंगरे (कन्हारटोली) यांनी त्यांच्या पसंतीचे झुनका भाकर बनवून दिले होते.
१९५४ ची ती लोकसभा निवडणूक होती. तत्कालीन भंडारा जिल्हा हा मागास जिल्हा म्हणूनच ओळखला जात होता. या भागाला विकासाच्या प्रवाहात आणावे म्हणूनच कदाचित बाबासाहेबांनी या जिल्ह्याची निवड केली होती. निवडणूक प्रचाराला बाबासाहेबांचे भंडाºयात आगमन झाले. तुमसर रस्त्यावरील कोलते यांच्या बंगल्यावर (सध्या अशोका ले लँड कंपनीचे प्रतीक्षालय) त्यांचा मुक्काम होता. त्यांच्यासोबत माईसाहेब आंबेडकर होत्या.
या बंगल्यात निवडणुकीची खलबत्ते चालत. काँग्रेसविरोधात प्रज्ञा समाजवादी पक्ष व शेड्युल कास्ट फेडरेशन मित्रपक्ष होते. प्रचारादरम्यान बाबासाहेबांनी ‘हरलो तरी चालेल, पण मी राज्यघटना लिहिली. मत गोठवणे घटनाविरोधी आहे. माझ्या अनुयायांनी नितीमूल्यांच्या विरोधात जावू नये’, असा पवित्रा घेतला होता. निवडणुकीत बाबा हरले, पण नितीमत्तेचा धडा देवून गेले. मात्र बाबासाहेब जिंकले असते तर कदाचित त्याच काळात अख्ख्या गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा कायापालट झाला असता.
बाबासाहेबांना देवाप्रमाणे मानणारी दलित मंडळी दूरदुरून दोन दिवसांपासून भंडाºयात येवून त्यांचे भाषण व दर्शनासाठी थांबली होती. त्यावेळी भंडाºयातील सर्व सभा गांधी चौक (टॉऊन हॉल) मध्ये होत असत. गर्दीच्या अपेक्षेने त्यांच्या भाषणाला मन्रो हायस्कूलचे खेळाचे पटांगण निवडण्यात आले होते. त्यावेळी प्रचंड गर्दी होती. काही जण वृक्षांवर चढून भाषण ऐकत होते. भाषणानंतर पाया पडणाºयांना हातातील काठीने बाबा नाईलाजाने दूर करीत होते.
कार्यकर्त्यांचा सायकलवरून प्रचार
समता सैनिक दलाचे लाल शर्ट घातलेले सैनिक बाबासाहेबांच्या प्रचारासाठी जीवाचा आटापिटा करीत होते. आपल्या भाषणात बाबासाहेब स्वाभिमानाने म्हणत, ‘माझ्या एका शब्दाने हे हिंदूस्थानला आग लावू शकतील.’ बाबासाहेबांच्या प्रचारासाठी अनेक कार्यकर्ते गावोगावी सायकलने फिरत होते. त्यावेळी अशोक मेहता व बाबासाहेबांच्या प्रचारार्थ जयप्रकाश नारायण, ना.ग. गोरे, एस.एम. जोशी हे सुद्धा जिल्ह्यात आले होते.
तडजोड नाकारली
निवडणुकीदरम्यान अशोक मेहतांचे खासगी सचिव डॉ. शांतिलाल व निवडणूक प्रचारप्रमुख अ‍ॅड. ज्वालाप्रसाद दुबे चर्चेकरिता बाबासाहेबांना भेटायला गेले होते. शेड्युल कास्ट फेडरेशनच्या मतदारांचे दुसरे मत अशोक मेहता यांना मिळावे आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या मतदारांचे दुसरे मत बाबासाहेबांना मिळावे, अशी तडजोड सूचविण्यात आली होती. मात्र कार्यकर्ते म्हणाले, ‘आम्ही निश्चित सांगतो की शेड्युल कास्ट फेडरेशनच्या मतदारांचे दुसरे मत प्रजा समाजवादी पक्षाला मिळेल. पण प्रजा समाजवादी पक्षाच्या मतदारांचे दुसरे मत शेड्युल कास्ट फेडरेशनला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही तडजोड करू नये, असे म्हटले. पण बाबासाहेबांनी नकार दिला व हारलो तरी चालेल, पण मत गोठविणे घटनाविरोधी व नितीमूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.
बाबासाहेबांनी खाल्ली भाकरी
भंडाºयात आल्यावर बाबासाहेबांना जोरात भूख लागली होती. तेथे कोणतेही प्रशस्त हॉटेल नव्हते. त्यांची गाडी दिनकरराव रहाटे यांच्या घराकडे वळली. दिनकररावांचे घर गल्लीत होते. गाडी रस्त्यावर थांबवून ते चालत गेले. दिनकररावांनी एका डब्यात भाकरी दिली. कोलतेंच्या वाडीवर जाऊन बाबासाहेबांनी जेवण केले. त्यावेळी दिनकरराव ‘सुदाम्या घरचे पोहे’ म्हणून ही आठवण सांगत असत. अशाच धावपळीत रहाटे यांच्या घराशेजारील वाचनालयालाही बाबासाहेबांनी भेट दिली.

Web Title: Babasaheb's memories are still alive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.