बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:34+5:302021-07-23T04:18:34+5:30
---------------------------- आई-वडिलांना डायबिटीस असेल तर... आई-वडिलांना डायबिटीस असेल तर बाळाला होणार असे नसतेच. मात्र, आई-वडिलांना डायबिटीस असल्यास त्यांना याची ...
----------------------------
आई-वडिलांना डायबिटीस असेल तर...
आई-वडिलांना डायबिटीस असेल तर बाळाला होणार असे नसतेच. मात्र, आई-वडिलांना डायबिटीस असल्यास त्यांना याची लक्षणे माहिती असतात. तीच लक्षणे बाळात आढळून आल्यास किंवा बाळ अचानक जास्त पाणी पिऊन जास्त लघवी करीत असेल, जास्त खाऊनही त्याचे वजन घटत असेल असे दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
---------------------------
काय लक्षणे आहेत.
बाळ अचानक जास्त प्रमाणात पाणी पिऊन जास्त प्रमाणात लघवीला जात असेल तर हे डायबिटीसचे लक्षण आहे. तसेच अचानक जास्त खायला लागला असेल; मात्र त्यानंतरही त्याचे वजन घटत असेल तर हे सुद्धा डायबिटीसचे लक्षण आहे. विशेष म्हणजे, लहान बाळांमध्ये टाइप-१ डायबिटीस जास्त आढळत असून त्यासाठी इन्सुलीनच सुरू करावी लागते.
---------------------------
बालरोग तज्ज्ञ म्हणतात...
आज लहान मुलांची दिनचर्या बदलली असून ते बाहेर खेळणे टाळत असून टीव्ही व मोबाइल बघत बसून असतात. शिवाय जंक फूड, चॉकलेट्स आदींचे सेवन त्यांना डायबिटीसकडे नेत आहे. अशात सर्वप्रथम जंक फूडचे सेवन बंद करावे. तसेच व्यायाम करावा, बाहेर जाता येत नसले तरी घरातच शारीरिक हालचाल करता येणारे खेळ खेळावे व शरीराकडून परिश्रम करवून घ्यावे.
- डॉ. अंशुमन चव्हाण
बालरोग तज्ज्ञ, गोंदिया.
----------------------------
लहान मुलांमध्ये सध्या जंक फूड - फास्ट फूडचे जास्त आकर्षण आहे. शिवाय बाहेर खेळणे सोडून ते मोबाइल, कॉम्प्युटर व टीव्हीसमोर बसून असतात. या सवयी डायबिटीसकडे त्यांना घेऊन जात आहेत. यामुळे जंक फूड - फास्ट फूड खाणे सोडून घरातील ताजे जेवण करावे. खानपानात सॅलड, भाज्या व फळांचा समावेश करावा. मैदानी खेळ खेळावे जेणेकरून शरीराकडून व्यायाम झाला पाहिजे.
डॉ. उमेश शर्मा
बालरोग तज्ज्ञ, गोंदिया.