आश्वासनानंतर उपोषण मागे
By admin | Published: January 4, 2017 01:05 AM2017-01-04T01:05:53+5:302017-01-04T01:05:53+5:30
पिंपळगाव येथे हनुमान वॉर्ड क्र. २ दलीत वस्ती सिमेंट रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
अतिक्रमण हटविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
चिचाळ : पिंपळगाव येथे हनुमान वॉर्ड क्र. २ दलीत वस्ती सिमेंट रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याच्याविरोधात अन्नपूर्णा मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी आठ दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन देवून त्यांचे उपोषण सोडले.
पिंपळगाव गावठाण हद्दीतील दलीत वस्तीमध्ये जाणाऱ्या मुख्य मार्गावर संतोष सुखदेवे यांचे शौचालय, भैरव वाहने यांच्या घराचा वऱ्हांडा व टिनपत्रे, रामजी मेश्राम यांच्या घराची पायरी व टिनपत्रे रस्त्यावर आल्याने बैलबंडीला अडथळा निर्माण होत होता. याविरूध्द अन्नपूर्णा मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरु केले. तहसीलदार एस. के. वासनिक, खंडविकास अधिकारी बी. वाय. निमसरकार, मुनिर शेख, ठाणेदार अजाबराव नेवारी यांनी उपोषण मंडपाला भेट देवून चौकशी केली. तहसीलदार यांनी ९ डिसेंबरपर्यंत अतिक्रमण काढण्याचे नोटीस देवून पूर्ववत सुचना देण्याचे ठरविले. गैरअर्जदाराने अतिक्रमण न काढल्यास १२ डिसेंबरला जेसीबीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन तात्काळ ग्रामपंचायतला काढण्यास सांगितले. व मेश्राम यांना निंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी ठाणेदार अजाबराव नेवारे सरपंच सुषमा येळणे, उपसरपंच अमित गाडेकर, अतूल कुर्झेकर, बंडू येळणे, कल्पना येळणे, शारदा गाडेकर, मंदा सेलोकर, राजकुमार येळणे, सुधाकर पंचभाई, मंदा लोखंडे, चित्रलेखा सुखदेवे, सुरेखा सुखदेवे, मनिषा मेश्राम, सुलोचना दहिवले, दुर्गा दहिवले, सकवार उके, राजकुमार सुखदेवे, दादाराव लोखंडे, नवनाथ मेश्राम, शिवनाथ मेश्राम, जितेंद्र सुखदेवे, धर्मदास दहिवले व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)