मिनी मंत्रालयात रिक्त पदांचा बॅकलॉग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:24 PM2018-04-12T21:24:48+5:302018-04-12T21:24:48+5:30
जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये गट ब, क, व ड मधील तब्बल ५३३ पदे रिक्त असल्याने त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये गट ब, क, व ड मधील तब्बल ५३३ पदे रिक्त असल्याने त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. रिक्त पदांमुळे अनेक फाईल्स अडकल्या आहेत. तर वांरवार फेºया मारुन कामे होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामविकासाची नाळ ही जिल्हा परिषदेशी जुडलेली असते. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. त्यामुळे विविध कामांसाठी येथे नागरिकांची वर्दळ असते. मात्र अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने त्यांची कामे वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत गट ‘ब’ चे ७१ पदे रिक्त आहेत. गट ‘क’ चे ४४४ पदे रिक्त असून यातील २७४ पदे सरळसेवा पध्दतीने भरायची आहेत. तर १७० पदे पदोन्नतीने भरायची आहेत. ‘ड’ गटातील १८ पदे रिक्त आहेत. यातील १० पदे सरळसेवा पध्दतीने तर ८ पदे पदोन्नतीतून भरायची आहेत. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असलेली गोंदिया जिल्हा परिषद राज्यात एकमेव असावी. त्यामुळे रिक्त पदांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रिक्त पदांमुळे येथील कामाकाजावर कसा परिणाम होत आहे. ही बाब त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या पदांमध्ये गट ‘ब’ मधील कक्ष अधिकाºयांची २ पदे, लघुलेखक (नि.श्रे.) एक, सहाय्यक लेखा अधिकारी ७, कृषी अधिकारी एक, कनिष्ठ अभियंता शा./अ. ५, विस्तार अधिकारी (शि) वर्ग ३ श्रेणी २ चे २ कर्मचारी, विस्तार अधिकारी (शि) वर्ग ३ श्रेणी ३ चे ९ कर्मचारी, कनिष्ठ सहाय्यक शिक्षक (वर्ग ११ ते १२) २४, केंद्रप्रमुख ९, केंद्रप्रमुख निवडीने २५, वर्ग ५ ते १० साठी माध्यमिक मुख्याध्यापक ७, कनिष्ठ अभियंता ७, कनिष्ठ अभियंता ३ अशी ७१ पदे, गट ‘क’ मधील अधिक्षक २, विस्तार अधिकारी (सा.) १, कनिष्ठ सहाय्यक ३६, वाहन चालक ३, कनिष्ठ लेखा अधिकारी १, वरिष्ठ सहाय्यक लेखा ७, कनिष्ठ सहाय्यक लेखा ७, ग्रामविकास अधिकारी ४, ग्रामसेवक २१, औषध निर्माता ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, आरोग्य पर्यवेक्षक ६, आरोग्य सहाय्यक ५, आरोग्य सेवक (पुरूष) ६५, आरोग्य सेविका १२३, आरोग्य सहाय्यीका महिला ३, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक १४, आरेखक २, कनिष्ठ आरेखक ६, पशूधन पर्यवेक्षक ७, पर्यवेक्षीका ७, निम्नश्रेणी स.अ. (मा.) (५ ते७) ६६, प्राथमिक शिक्षक ४२, प्र.शा. सहाय्यक ७ अशी पदे ४४४ रिक्त आहेत. गट ‘ड’ मधील परिचर १०, हवालदार १, नाईक १, पट्टीबंधक औषधोपचारक ६ अशी १८ पदे रिक्त आहेत.
कर्मचारी बिनधास्त
जि.प.मध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना नागपूरचे आकर्षण आहे. येथील कर्मचारी अधिकारी बिनधास्त असून ते नागपूरवरून अप-डाऊन करतात व गोंदियात वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र जोडून घरभाडे भत्त्याची उचल करतात. गोंदियात कुणी अधिकारी यायला तयार नाही. त्यामुळे प्रमुख विभागातील अधिकारी नाही. त्यामुळे या विभागात काम करणारे कर्मचारी आपल्या मर्जीनुसार कामे करतात. अनेक कर्मचारी नागपूर, भंडारा, तुमसर व तिरोडा येथून दररोज अप-डाऊन करतात. दुपारी ३ वाजतानंतर जि.प.च्या बहुतांश विभागात शुकशुकाट असतो.
प्रगत प्रशासनासाठी रिक्त पद भरणे आवश्यक आहे. जि.प.मध्ये रिक्त पदामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. संबंधित नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यासाठी रिक्त जागा भरण्याची मागणी महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
-गंगाधर परशुरामकर,
विरोधी पक्षनेते, जि.प.गोंदिया.