शेअरमध्ये नफ्याचे आमिष, नफ्याचे आमिष देऊन केली होती फसवणूक, ३ लाख ५६ रूपयांना गंडा 

By नरेश रहिले | Published: February 19, 2024 06:45 PM2024-02-19T18:45:46+5:302024-02-19T18:46:00+5:30

दिलीपकुमार सुभाष मटाले यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक केली होती.

Bait of profit in shares, fraud was done by baiting profit, 3 lakh 56 rupees were extorted | शेअरमध्ये नफ्याचे आमिष, नफ्याचे आमिष देऊन केली होती फसवणूक, ३ लाख ५६ रूपयांना गंडा 

शेअरमध्ये नफ्याचे आमिष, नफ्याचे आमिष देऊन केली होती फसवणूक, ३ लाख ५६ रूपयांना गंडा 

गोंदिया: शेअर बाजारातून जास्त नफा मिळवुन देतो असे आमिष दाखवुन ऑनलाईन वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडून त्यावर लोकांकडुन रक्कम घेत लोकांची फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील आरोपीला आमगाव पोलिसांनी मुंबई अटक करून आणले. कल्पेश सतिश मिश्रा (३८) रा. सांताक्रुझ मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील दिलीपकुमार सुभाष मटाले यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक केली होती. यासंदर्भात आमगाव पोलीस ठाण्यात २६ जून २०२३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहीती तंत्रज्ञ अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्याकडे होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरीता आमगाव पोलीस पथक मुंबई करिता रवाना करण्यात आले होते. पोलीस पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंन्द्रे, पोलीस शिपाई साबळे हे मुंबई येथे गेले.

आरोपीचा शोध करीत असताना आरोपी हा वारंवार आपले मोबाईल क्रमांक बदलत असल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड होते. पोलीस पथकाने वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना मानवी कौशल्याचा वापर करुन व प्राप्त गोपनीय माहीती वरुन गुन्ह्यातील आरोपीचे तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या माहितीचे विश्लेषन करुन शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणूक केली. आरोपी कल्पेश सतिश मिश्रा (३८) रा. सांताकृझ मुंबई याला १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सांताकृझ पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाच्या मदतीने धाड घालून पहाटे ताब्यात घेतले.
 
यांनी केली कारवाई
या प्रकरणात पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, शेंन्द्रे व पोलीस शिपाई साबळे यांनी केली आहे.
 
अनेकांची केली फसवणूक
आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील दिलीपकुमार सुभाष मटाले यांची ३ लाख ५६ हजार ५७ रूपयाने फसवणूक करण्यात आली होती. याच बरोबर या आरोपीने अनेकांकडून पैसे लुबाडल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Bait of profit in shares, fraud was done by baiting profit, 3 lakh 56 rupees were extorted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.