महागाई विरोधात बैलबंडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:50 PM2018-02-02T23:50:52+5:302018-02-02T23:51:23+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.२) वाढत्या महागाई विरोधात उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा आणि ‘संविधान बचाव- देश बचाव’ रॅली काढण्यात आली. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.२) वाढत्या महागाई विरोधात उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा आणि ‘संविधान बचाव- देश बचाव’ रॅली काढण्यात आली. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते.
मोर्चा निघण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, माजी जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, माजी जि.प.सभापती पी.जी.कटरे, राजेश नंदागवळी, डॉ. योगेंद्र भगत, पं. स. उपसभापती माधुरी हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालिसंग गुलाटी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खºया अर्थाने लोकशाहीची स्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम आहे. मात्र केंद्र व राज्यातील सरकार वारंवार संविधान बदलण्याचे भाष्य करीत आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. भाजपा सरकार केवळ देशातील जनतेला आश्वासने देवून त्यांची फसवणूक करीत आरोप कोरोटे यांनी केला. वाढत्या महागाई, बेरोजगारी, शेतमालाल कमी दर यासह महत्वपूर्ण समस्यांकडे भाजपाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेची फरफट होत असल्याचे सांगितले.
पुरूषोत्त कटरे यांनी सुध्दा भाजप सरकार जोरदार टिका केली. केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. अर्थसंकल्पात देखील केवळ २०१९ मधील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घोषणा केल्या. त्या सुध्दा पूर्ण होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. पेट्रोल व डिझलची दरवाढ, वाढती महागाई, शेतमालाल मिळणारा अल्प दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर मोर्चेकरी बैलबंडीनेच एसडीओ कार्यालयात पोहोचले. कटरे यांच्या नेतृत्त्वात विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. त्यानंतर मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजपावर जोरदार टीका व हल्लाबोल केला. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले व आभार संकेश तिवारी यांनी मानले. यावेळी नगरसेवक राकेश ठाकूर, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, संदीप ठाकूर, सुशिल रहांगडाले, संकेश तिवारी, शेषराव गिऱ्हेपुंजे, विकास बंसल, देवेंद्र अग्रवाल, गुड्डू ठाकूर, देवा रूसे, संदीप रहांगडाले, नगर कॉग्रेसचे अध्यक्ष बलिजतिसंग बग्गा, सौरभ शर्मा, व्यंकट पाथरू, कुरमराज चौहान, देवा रूसे, भागवत मेश्राम, अॅड. योगेश अग्रवाल यांचा समावेश होता.