बँक कर्मचाºयांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:15 AM2017-08-23T00:15:35+5:302017-08-23T00:16:20+5:30
युनायटेड फोरम बँक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने ग्राहक विरोधी बँकिंग धोरण व वाढीव सेवा शुल्काचा विरोध करीत आपल्या मागण्यांसाठी बँक कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.२२) एक दिवसीय संप पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : युनायटेड फोरम बँक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने ग्राहक विरोधी बँकिंग धोरण व वाढीव सेवा शुल्काचा विरोध करीत आपल्या मागण्यांसाठी बँक कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.२२) एक दिवसीय संप पुकारला.
या देशव्यापी संपात देशभरातील सुमारे १० लाख अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती आहे.
ग्राहक विरोधी बँकींग धोरण, थकित कर्ज राईट आॅफ करणे, वाढीव सेवा शुल्काचा युनियन विरोध करीत आहे. तसेच थकीत कर्ज वसुलीसाठी संसदीय समितीच्या सुधारणा लागू करा, थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर कायदे करा, प्रस्तावीत एफआरडीआय बील मागे घ्या, बँक बोर्ड ब्युरो बरखास्त करा, बँकांतून सर्व श्रेणीत पुरेशी नोकर भरती करा, कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्या मान्य करण्यात याव्या. या मागण्यांसाठी युनियनने हा संप पुकारला होता.
संपांतर्गत काही बँकातील अधिकारी व कर्मचारी मंगळवारी (दि.२२) सकाळी येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर एकत्रीत आले. याप्रसंगी युनियनच्या पदाधिकाºयांनी उपस्थितांना संपाबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासन व बँक विरोधी धोरणांच्या विरोधात नारेबाजी केली.
याप्रसंगी युुनियनचे जिल्हाध्यक्ष भास्कर राव, सचिव चंद्र प्रकाश, पंकज शारणागत, विजय ठवरे, निलेश चौधरी, ओमप्रकाश बुरडे, प्रिती चित्रीव, स्वाती शुक्ला, रिता सुखदेवे, देवीसींग सयाम, राकेश कोल्हे, मिलींद ठक्कर, प्रवीण बिसेन, छटवानी, दीपक बडवाईक, सुशांत शहारे, राजू कदम, पुंडलीक उके, पृथ्वीराज भैसारे, गणेश डडूरे, प्रमोद नाडेवार, राहूल लेहूरे, धर्मराज, शशी पटेल, कपिल मिश्रा, एस.एस.लिल्हारे, मोरेश्वर कुथे, मयाराम राऊत, अर्जुनसिंग ठाकूर, अनिल सुर्यवंशी, धनंजय मेश्राम, पुनम कनोजिया, रेखा धकाते, राजश्री आंबेडारे उपस्थित होते.