बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:00 AM2020-12-17T05:00:00+5:302020-12-17T05:00:16+5:30
या कर वसुलींतर्गत पथकाने सोमवारी (दि.१४) एक्सीस बॅँकेच्या एटीएमला सील ठोकले. तर मंगळवारी (दि.१५) सिव्हील लाईन्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयाला दणका दिला. त्यानंतर बुधवारी (दि.१६) पथकाने पुन्हा कठोरतेने अभियान राबवित शहरातील मनोहर चौकातील बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला सील ठोकले. सन २०१४-१५ पासून त्यांच्यावर एक लाख ८९ हजार ८१२ रूपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे सोमवारी एक्सीस बॅंकेचे एटीएम सील केल्यानंतर बुधवारी (दि.१६) कर वसुली पथकाने मनोहर चौकातील बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला सील ठोकले. सन २०१४-१५ पासून थकून असलेले एक लाख ८९ हजार ८१२ रूपये भरण्यात न आल्याने पथकाने ही कारवाई केली. तर शहरातील मोटवानी चेंबर मधील दुकानदारांनी ऐनवेळी पैसे भरल्याने त्यांच्या दुकानांवरील कारवाई टळली.
सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीसाठी नगर परिषदेचे कर वसुली पथक आता कठोर पावले उचलत आहेत. यातूनच आतापर्यंत इतिहासात कधीच करण्यात आलेल्या सीलींगच्या कारवाया दररोज कुणालाही न जुमानता केल्या जात असल्याचे दिसत आहे.
या कर वसुलींतर्गत पथकाने सोमवारी (दि.१४) एक्सीस बॅँकेच्या एटीएमला सील ठोकले. तर मंगळवारी (दि.१५) सिव्हील लाईन्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयाला दणका दिला. त्यानंतर बुधवारी (दि.१६) पथकाने पुन्हा कठोरतेने अभियान राबवित शहरातील मनोहर चौकातील बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला सील ठोकले. सन २०१४-१५ पासून त्यांच्यावर एक लाख ८९ हजार ८१२ रूपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे.
त्यानंतर पथकाने शहरातील मोटवानी चेंबरमधील ५ दुकानांचे शटर खाली पाडले होते. मात्र संबंधितांनी थकीत असलेल्या दोन लाख २५ हजार ३२१ रूपयांचा धनादेश दिल्याने या दुकानांवरील कारवाई टळली. तसेच मनोहर चौकातील हॉटेल सेंटर पॉईंट बार व रेस्टॉरंटवर धकड देण्यात आली. मात्र त्यांनीही सन २०१३-१४ पासून थकून असलेल्या एक लाख ४५८ रूपयांचा धनादेश पथकाला दिला. त्यामुळे या हॉटेलवरील कारवाईही टळली.
६.६३ लाखांची वसुली
कर वसुली पथकाकडून कुणालाही न जुमानता कारवाई केली जात असल्याने शहरातील थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, पैसा न भरल्यास थेट कारवाई हाच पवित्रा पथकाने घेतल्याने थकबाकीदारांकडून आता पैसे भरून सहकार्य केले जात असल्याचेही दिसत आहे. यातूनच पथकाने बुधवारी सहा लाख ६३ हजार ३९८ रूपयांची मालमत्ता कर वसुली केल्याची माहिती उपमुख्याधिकारी व कर अधिकारी विशाल बनकर यांनी दिली.