इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बँकेचे व्यवहार खोळंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:56 PM2019-01-31T21:56:41+5:302019-01-31T21:57:00+5:30
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे गुरूवारी (दि.३१) शहरासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना बँका, शासकीय कार्यालयांना सुध्दा याचा फटका बसला. इंटरनेट सेवा ठप्प असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे गुरूवारी (दि.३१) शहरासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना बँका, शासकीय कार्यालयांना सुध्दा याचा फटका बसला. इंटरनेट सेवा ठप्प असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.
केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने डिजीटल इंडियाचा नारा दिला. बहुतेक व्यवहार त्यामुळे आॅनलाईन केले जाते. शासकीय कार्यालय असो वा बँका आणि खासगी कार्यालयाचे कामकाज सुध्दा इंटरनेट सेवेवर अवलंबून आहेत. तर मोबाईल ही नागरिकांची आवश्यक गरज झाली आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प झाल्यास सर्व व्यवहारांना ब्रेक लागत असल्याचे चित्र पाहयला मिळते. याचा अनुभव गोंदिया जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बुधवार व गुरूवारी आला. प्राप्त माहितीनुसार बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास गोंदिया-तुमसर सुमारास बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली होती. बुधवारी सायंकाळपासून बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे मोबाईल काम करीत नव्हते.त्यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास बीएसएनएलची सेवा पुर्ववत सुरू झाली. मात्र ती सुध्दा मध्ये मध्ये बंद पडत असल्याने शहरातील सर्व बँकांची लिंक फेल झाली होती. त्यामुळे बँकाचे आर्थिक व्यवहार सुध्दा ठप्प झाल्याने अनेक ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.शहरासह आमगाव व गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंटरनेटसेवा प्रभावित झाली होती. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या कार्यालयाकडे धाव घेत यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. याबाबत विचारणा केली असता ग्रामीण भागाचे इंचार्ज बैठकीसाठी गेल्याचे सांगितले.
गोंदियाचे काम भंडाºयावरुन
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होवून २० वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही येथील बीएसएनएल कार्यालयाचा कारभार भंडाºयावरुन सुरू आहे. केवळ तांत्रिक कामेच गोंदिया येथील कार्यालयातून होत आहे. त्यामुळे बरेचदा सेवेत बिघाड आल्यानंतर दुरूस्ती होण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते.
बांधकामाची माहिती नाही
बीएसएनएलच्या एका कर्मचाºयांने दिलेल्या माहितीनुसार नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या रस्ता बांधकामाची माहिती या विभागाला मिळत नाही. रस्त्याच्या खोदकामादरम्यान इंटरनेटचे आॅपटीकल केबल तुटत असल्याने सेवा ठप्प होते. संबंधित विभागाने याची वेळीच माहिती दिल्यास उपाय योजना करण्यास मदत होईल असे सांगितले.