संपत्तीच्या हिस्सेवाटणीतून बापलेकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:30+5:302021-05-19T04:30:30+5:30
फिर्यादी लोकचंद चैतराम बिसेन (वय ४८, रा. चौपनटोली) व आरोपींचे वडिलोपार्जित घर व शेतीच्या वाटणीला घेऊन वाद आहेत. ...
फिर्यादी लोकचंद चैतराम बिसेन (वय ४८, रा. चौपनटोली) व आरोपींचे वडिलोपार्जित घर व शेतीच्या वाटणीला घेऊन वाद आहेत. अशात घटनेच्या दिवशी रात्री लोकचंद बिसेन हे घरासमोरील अंगणात पत्नी व सुनेसोबत बोअरवेल व ट्रॅक्टरबाबत चर्चा करीत होते. यावेळी आरोपी क्रमांक २ याने त्यांना सुरू असलेल्या संपत्तीच्या वादाच्या रागातून शिवीगाळ केली. लोकचंद यांनी त्याला शिवीगाळ करू नको असे म्हणत हटकले. यावर आरोपी क्रमांक १ याने त्यांना पकडून ठेवले व आरोपी क्रमांक २ याने रॉडने डोक्यावर मारून त्यांना जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी लोकचंद यांचा मुलगा मध्ये पडला असता आरोपी क्रमांक २ याने त्याच्या गळ्यावर चावा घेतला व नाकावर बुक्की मारून जखमी केले. पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ५०४, २४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.