उकाड्याने केले हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 09:21 PM2019-06-02T21:21:28+5:302019-06-02T21:21:49+5:30
यंदा सुर्यदेव चांगलेच खवळले असतानाच नवतपाही कधी नव्हे तसा तापला. २५ मेपासून सुरू झालेल्या या नवतपात यंदाची सर्वाधीक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, नवतपात एक-दोनदा बरसलेल्या सरींमुळे आणखीच अडचण वाढली असून उकाडा व उमसने हैरान केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा सुर्यदेव चांगलेच खवळले असतानाच नवतपाही कधी नव्हे तसा तापला. २५ मेपासून सुरू झालेल्या या नवतपात यंदाची सर्वाधीक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, नवतपात एक-दोनदा बरसलेल्या सरींमुळे आणखीच अडचण वाढली असून उकाडा व उमसने हैरान केले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून पाऊस बरसण्याची वाट बघत आहेत.
उन्हाळ््यातील चार महिने तसेही असह्य असतात. मात्र या चार महिन्यांत जेवढा उन्हाळा तापत नाही तेवढे उन्ह नऊ दिवसांत पडते व त्यालाच नवताप म्हणतात. या नऊ दिवसांत सुर्य पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटते म्हणूनच नवतपा म्हणताच भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळते.
यंदा २५ जून पासून नवतपा सुरू झाला व नावाप्रमाणे चांगलाच तळपल्याचेही दिसले. यंदाच्या उन्हाळ््यातील सर्वाधीत ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद याच नवतपात २८ जून रोजी घेण्यात आली. यावरून यंदाचा नवतपा कसा तळपला असेल याची प्रचिती येते.
विशेष म्हणजे, नवतपादरम्यान एक-दोनदा पाऊस बरसला व त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यामुळे आणखीच त्रास वाढला असून उकाडा व सोबतच उमसने सर्वांना हैरान करून सोडले आहे.
पावसानंतर वातावरणात गारवा नव्हे तर उमस वाढली असून अंग चिपचिप होत आहे. २ जून रोजी नवतपा संपणार असून पावसाचा काही थांगपता नसल्याने या उन्हापासून सध्यातरी सुटका दिसत नाही. अशात सर्वांच्या नजरा अकाशाकडे लागल्या असून एकदाचा पाऊस बरसून उकाड्यापासून सुटका व्हावी याची सर्वच वाट बघत आहेत.
पारा ४० अंश पारच
नवतपाच्या पहिल्याच दिवशी २५ जून रोजी जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली. त्यानंतर २८ जून रोजी ४५.५ अंश सेल्सिअस नंद घेण्यात आली. त्यानंतर पार कधी वर तर कधी खाली होत गेला. मात्र सातत्याने ४० अंश सेल्सिअसवरच नोंद घेतली जात आहे. २ जून रोजी नवतपा संपणार असून त्यानंतरही तापमान काही खाली येणार असल्याचे दिसत नाही. जोपर्यंत संततधार पाऊस बरसणार नाही तोपर्यंत या उकाड्यापासून सुटका नसल्याचे दिसत आहे.