सावधान! ९७ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:22+5:302021-07-15T04:21:22+5:30

गोंदिया : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणीसाठ्यातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले ...

Be careful! In 97 villages, only drinking water can be the cause of the disease | सावधान! ९७ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

सावधान! ९७ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

Next

गोंदिया : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणीसाठ्यातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातात. ८ पैकी २ तालुक्यांनी नमुनेच पाठविलेले नाहीत; परंतु ज्या सहा तालुक्यांतील २०१८ पाणी नमुने आले, त्यापैकी तब्बल ९७ नमुने दूषित आढळले आहेत. मे व जून महिन्यातील हा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून मिळाला आहे. यावरून पिण्याचे पाणीच आजाराचे कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना उपाययोजनांमध्ये आरोग्य विभाग व्यस्त झाला. त्यामुळे पिण्याचे पाणी नमुने घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. नमुन्यांची संख्या तर घटली, शिवाय ज्यांनी पाठविले त्यांचा दूषित येण्याचा आकडाही मोठा आहे. गोंदिया जिल्ह्यात पाण्याचे स्रोत १३ हजार ६६१ आहेत. त्यापैकी २०१८ नमुने घेतले असून, त्यात ९७ दूषित आढळले आहेत. ज्या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविले नाहीत, अशा आरोग्य केंद्रांना पत्र देण्यात आले आहे.

.....................................................

ज्या गावात तपासणीच झाली नाही त्याचे काय?

१) गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व अर्जुनी-मोरगाव या दोन तालुक्यांतील एकाही गावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले नाहीत. त्या तालुक्यांनी कामात कुचराई केली आहे.

२) पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी कसलेही कारण न सांगता प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य साहाय्यकांनी गावात जाऊन पिण्याचे पाणी असलेल्या सार्वजनिक पाणीसाठ्यांचे नमुने प्रयोशाळेत पाठविणे बंधनकारक आहे.

३) आरोग्य साहाय्यक व इतर कर्मचारी कामात कुचराई करतात. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश गावांतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पोहोचलेच नाहीत.

........................

कोरोनामुळे नमुने घटले

- कोरोनामुळे पाणी नमुने घेण्याची संख्या घटली आहे. पाणी नमुने पाठविण्यास उशीर झाल्यास तत्काळ पत्र काढले जाते. तसेच दूषित पाणी नमुन्यांची माहिती मेलद्वारे कळवून उपाययोजना करण्यास सांगितले जात असल्याचे वरिष्ठ रासायनिक सहायक मुकेश त्रिपाठी यांनी सांगितले.

- कोरोनाच्या कामात आरोग्य विभाग मशगूल झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोरोनाच्या कामाच्या व्यापात पाण्याचे नमुने घेण्यातच आले नाहीत.

- कोरोनामुळे वरिष्ठ अधिकारी सतत कोणते ना कोणते काम आरोग्य सेवकांवर टाकत असल्याने पाण्याचे नमुने घेण्याच्या या नियमित कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

......................................

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

- साथरोग व जलजन्य आजारापासून बचावासाठी पाणी उकळून पिण्याची गरज आहे.

- पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची काळजी घेऊन ते वाहते करावे.

- सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच तत्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन उपचार करून घ्यावेत.

- ज्या आरोग्य केंद्रांतर्गत गावातील पाणी नमुने गेले नाहीत त्यांना तत्काळ सूचना केल्या जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे म्हणाले.

......................

नमुने घेतले तपासणीसाठी - २०१८

नमुने आढळले दूषित - ९७

...................

- गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी १ जून २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येणार आहे.

- दूषित स्रोतांवर शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणी नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्याचे पत्र सर्व खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

........................

तालुकानिहाय आढावा

तालुका------- नमुने घेतले--- दूषित नमुने

गोंदिया---------६७६------------२२

तिरोडा-----------००-------------००

गोरेगाव----------५०१----------४६

आमगाव----------२२५--------००

देवरी--------------२६९---------१३

सालेकसा----------११६--------०९

सडक-अर्जुनी------२३१-------०७

अर्जुनी-मोरगाव-----००-------००

Web Title: Be careful! In 97 villages, only drinking water can be the cause of the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.