शेतकºयांनो कीटनाशका बाबत काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:53 PM2017-10-07T23:53:40+5:302017-10-07T23:53:58+5:30

जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून जिल्ह्यात सप्टेबर अखेर ७१४.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे.

Be careful about farmers' insecticides | शेतकºयांनो कीटनाशका बाबत काळजी घ्या

शेतकºयांनो कीटनाशका बाबत काळजी घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागातर्फे मार्गदर्शन : यवतमाळच्या घटनेनंतर दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून जिल्ह्यात सप्टेबर अखेर ७१४.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. १ लाख ५१ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी करण्यात आली.वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता यामुळे भात पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव आहे.त्यामुळे पीक संरक्षणासाठी शेतकºयांनी फवारणी सुरू केली आहे. पिकावरील कीड व रोग यांचे नियंत्रण करताना कीटनाशके वापरताना ती काळजीपूर्वक हाताळणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
किडनाशके फवारतांना रासायनिक औषधाचे बारीक कण हवेबरोबर नाक, तोंड, त्वचा किंवा डोळ्याद्वारे शरीरात जाते. त्यामुळे जीवास हानी पोहचू शकते. यासाठी कीटनाशके वापरण्यापूर्वी लेबल व माहिती वाचून खबरदारीच्या सूचनांचे पालन करा. जोराचा वारा वाहत असल्यास फवारणी टाळावी. फवारणीचे वेळी तंबाखू, बिडी, गुटखा, पान आदिचे सेवन करु नये. तणनाशके व किडनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा तसेच गळते फवारणी यंत्र न वापरता दुरु स्त करु न वापरावे. फवारणी करतेवेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. फवारणी झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. किटकनाशकाच्या बाटल्या वापरानंतर नष्ट कराव्यात.
या गोष्टींची घ्या काळजी
धोकादायक कीटनाशके वापरताना संरक्षण कपडे जसे रबरी हातमोजे, चष्मा, रबरी बुट, लांब पायजामा घालावा व फवारणी सहा तासापेक्षा जास्त वेळ करु नये. किटकनाशके पोटात गेले असल्यास प्रथमोपचारासाठी पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यासाठी भाग पाडावे. त्यासाठी १५ ग्रॅम मीठ, ग्लासभर कोमट पाण्यातून पिण्यास दयावे. उलटीद्वारे पाणी स्वच्छ येईपर्यंत ही कृती करावी. हाताची बोटे अथवा चमच्याचा टोकाकडील भाग घशात घालूनही उलट्या करु न घ्याव्यात. जर रोग्याला सारख्या उलटी होत असतील तर वरील उपचार करु नये. श्वसनाद्वारे कीटनाशकाची विषबाधा झाली असल्यास रु ग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत न्यावे. खिडक्या व द्वारे उघडावे. रु ग्णाचे कपडे सैल करावे. श्वासोच्छवास नियमीत होत नसल्यास त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दयावा. त्वचेवर कीटनाशके पडल्यास त्वचा पाण्याने त्विरत धूवून काढावी. त्वचा साबन आण िपाण्याची पूर्णपणे धुवून काढावी.
डोळ्यांची घ्या काळजी
डोळ्यात कीटनाशके गेल्यास ताबडतोब पाण्याचा प्रवाह डोळ्यात सोडून डोळे धुवावेत. डॉक्टर येईपर्यंत सतत डोळे धुत राहावे. किडनाशकाची फवारणी करताना कीटनाशक पोटात जावून विषबाधा झाल्यास तात्काळ डॉक्टराला बोलवावे. तोपर्यंत पोटात गेलेले विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यास भाग पाडावे. श्वसनाद्वारे विषबाधा झाल्यास रु ग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत ठेवावे. रोग्याला घाम येत असल्यास स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसावे. कीटनाशके फवारणी करताना शेतकरी बांधवांनी अशाप्रकारे विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Be careful about farmers' insecticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.