वाहतुकीचा नियम तोडाल तर खबरदार; ८० सीसीटीव्हीची तुमच्यावर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 05:00 AM2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:04+5:30
कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेरे सुरूही झाले परंतु संपूर्ण काम न झाल्यामुळे सद्यस्थितीत त्या कॅमेऱ्यांच्या संचलनाची जबाबदारी पाेलिसांकडे देण्यात आली नाही. गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३५ हजार ३९ जणांना मागील ११ महिन्यात दंड केला. त्या दंडाची रक्कम १५ लाख १८ हजार आहे. गोंदिया शहरात बसविण्यात आलेल्या ८० कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चपराक बसणार आहे. नियम मोडले तर खबरदारीचा इशारा पोलिसांकडून वाहन चालकांना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अनियंत्रीत वाहन चालविल्याने अपघातात वाढ होत आहे. वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालवित असल्याने त्या वाहन चालकांना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाॅच ठेवला जाणार आहे. यासाठी गोंदिया शहरातील ८० ठिकाणी चौकाचौकात कॅमेरे बसविण्यात आले आहे. गुन्हेगारीवर वाॅच ठेवण्यासाठी व अनियंत्रीत वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी हे सीसीटीव्ह कॅमेरे मदत करणार आहेत. या सीसीटीव्हींचे काम सुरू आहे. कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेरे सुरूही झाले परंतु संपूर्ण काम न झाल्यामुळे सद्यस्थितीत त्या कॅमेऱ्यांच्या संचलनाची जबाबदारी पाेलिसांकडे देण्यात आली नाही. गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३५ हजार ३९ जणांना मागील ११ महिन्यात दंड केला. त्या दंडाची रक्कम १५ लाख १८ हजार आहे. गोंदिया शहरात बसविण्यात आलेल्या ८० कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चपराक बसणार आहे. नियम मोडले तर खबरदारीचा इशारा पोलिसांकडून वाहन चालकांना आहे.
या कारणास्ताव होते कार्यवाही
हेल्मेट न वापरणे, परवाना न काढता वाहन चालविणे, भरधाव व धोकादायक स्थितीत वाहन चालविणे, नो पार्कींग, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, ट्रीपल सीट, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सीट या वाहनांवर कारवाई केली जाते.
१५ लाख १८ हजाराचा दंड वसूल
विना हेल्मेटच्या ७९ चालकांना ३९ हजार ५०० रूपये दंड, नो पार्कींगच्या १६४ वाहनांना ३६ हजार ८०० रूपये, सीटबेल्ट नसलेल्या ३७०९ चालकांना ७ लाख ४१ हजार ८०० रूपये, भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्या ५९ जणांना ५९ हजार, मोबाईलवर बोलणाऱ्या २९३ चालकांना ५८ हजार ६००, परवाना न घेतलेल्या १४४ जणांना ७१ हजार ७००, धोकादायक वाहन चालविणाऱ्या ४१ जणांना ४१ हजार, वाहतुकीस अडथळाच्या ९२८ प्रकरणांत १ लाख ८५ हजार ६०० रूपये, ट्रीपलसीटच्या १४२० चालकांना २ लाख ८४ हजार रूपयाचा दंड ठोठावून ११ महिन्यात वसूलही करण्यात आला.
एप्रिल महिन्यात सर्वाधिक कारवाया
कोरोनामुळे यंदा एप्रिल महिन्यात सर्वत्र लाॉकडाऊन होते. परंतु या काळात घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांवर सर्वाधीक कारवाई करण्यात आली. ५ हजार ७२९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यंदाच्या ११ महिन्यातील सर्वाधीक कारवाया एप्रिल महिन्यातील आहे.
भरधाव वेगात वाहने चालविल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. यात मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात. यंदाच्या सुरूवातीच्या नऊ महिन्यातील अपघातात ७४ जणांचा मृत्यू झाला. परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यातच ४२ जणांचा अपघातात मृत्यू झाला. हे मृत्यू भरधाव वेगात वाहन चालविल्यामुळे आहेत.
-दिनेश तायडे पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.