सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:06+5:302021-09-13T04:27:06+5:30
गोंदिया : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. परंतु युवा बेरोजगार आहे, गॅस सिलिंडरचे भाव गगनाला ...
गोंदिया : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. परंतु युवा बेरोजगार आहे, गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहे, पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवून महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. तर दुसरीकडे कोरोनाकाळातील ऑक्सिजनची पूर्तता, प्लांटसाठी मदत, मेडिकल कॉलेज इमारतीला मंजुरी, घरकुल, शेतीसाठी पाणी, बोनस समस्या सोडविण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतला. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसची शिकवण असून, यामुळेच प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर रहावे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्राम पांढराबोडी येतील रिताराम लिल्हारे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्ता बैठक ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी, प्रत्येक गावात बूथ कमिटी निर्माण करणे व येत्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी बूथ कमिटीचे सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. पक्ष वाढीकरिता कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडी-अडचणी सोडविल्या पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी ग्राम पांढराबोडी, लहिटोला, गिरोला व लोहारा येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
बैठकीला रविकांत बोपचे, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, चंदन गजभिये, साधना चंदनलाल गजभिये, चंद्रकला वघारे, अश्विन ढोमणे, इंदल सिहारे, अरुण चव्हाण, राजू गौतम, पिंटू कटरे, राजेश नागपूरे, शैलेश वासनिक, सुनील पटले, स्वाती दमाहे, विनायक शर्मा, नागरत्न बांसोड, सनम बांसोड़, अश्विन चव्हाण, पिंटू कटरे, भगवत पटले, बाबा लिल्हारे, इंदराज चूलपार, नेमीचंद ढेकवार, राजेश नागपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता आदी उपस्थित होते.