धान खरेदीसाठी आता गुरुवारपासून धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:57+5:302021-05-22T04:27:57+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील धान खरेदी सुरू करण्यासंदर्भात १७ मे रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदन देत धान खरेदी सुरू ...

The bear agitation now from Thursday for the purchase of grain | धान खरेदीसाठी आता गुरुवारपासून धरणे आंदोलन

धान खरेदीसाठी आता गुरुवारपासून धरणे आंदोलन

Next

गोंदिया : जिल्ह्यातील धान खरेदी सुरू करण्यासंदर्भात १७ मे रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदन देत धान खरेदी सुरू न झाल्यास आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान, भाजपा जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि.२१) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मंगळवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यात सर्व केंद्र धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास गुरुवारपासून (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.२१) आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जिल्हा भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले. यावेळी त्यांंच्यासह भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे उपस्थित होते. निवेदनानुसार खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करुन रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी सर्व हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. आजघडीला रब्बीच्या धानाची कापणी पूर्णत्वास आली आहे. तर खरिपाचा हंगामही डोक्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी शेतकर्‍यांच्या हातात दमडीही नाही. शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना पडक्या किमतीत आपले धान विकावे लागत आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे मंगळवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यातील सर्व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास गुरुवारपासून (दि.२७) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यासोबतच शेतकर्‍यांच्या कर्जाच्या रक्कमेची दरवर्षी पूर्ण परतफेड केल्यावर देण्यात येणारे ५० हजार प्रोत्साहन अनुदान व शेतकर्‍यांना धानविक्रीवर दिला जाणारा ७०० रुपये बोनस त्वरित देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: The bear agitation now from Thursday for the purchase of grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.