बाबासाहेबांच्या संविधानामुळेच सामान्य माणूस मोठा
By admin | Published: January 21, 2017 12:24 AM2017-01-21T00:24:39+5:302017-01-21T00:24:39+5:30
भारतीय सर्व घटकातील लोकांना समान संधी व समाान अधिकार मिळावे, त्यांचा सर्वच स्तरातून विकास व्हावा,
संजय पुराम : आंतरराष्ट्रीय धम्म संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम
आमगाव : भारतीय सर्व घटकातील लोकांना समान संधी व समाान अधिकार मिळावे, त्यांचा सर्वच स्तरातून विकास व्हावा, या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला आदर्श संविधान दिले. त्यांचे उदाहरण म्हणून मी एक आमदार म्हणून आपणापुढे उभा आहे. मी आमदार होणे यात माझे काहीही नसून ही बाबासाहेबांच्या संविधानाची पुण्याई आहे. बाबासाहेबांनी या देशाला आदर्श घटना देऊन फार मोठे उपकार केले. याची जाणीव प्रत्येक व्यक्तीने ठेवली पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या माणसाची प्रगती निश्चित असून त्यांच्या संविधानानेच या देशातील सामान्य माणूस मोठा होऊ शकतो. असे सांगून आपल्या विकास निधीतून धम्मगिरी पर्यटन स्थळ विकासासाठी दहा लाख रुपये विकासनिधीची घोषणा आमदार संजय पुराम यांनी केले.
येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्या वतीने आयोजित १४ जानेवारीला आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप बन्सोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, माजी आ. केशवराव मानकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, समाजसेविका शारदा राजकुमार बडोले, जि.प. सदस्य विश्वजीत डोंगरे, सुखराम फुंडे, जिल्हा काँग्रेस महासचिव सहषराम कोरोटे, भाजप तालुकाध्यक्ष अॅड. येसूलाल उपराडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष धिरेशभाई पटेल, राकाँ तालुकाध्यक्ष प्रा. कमल बहेकार, सरपंच रिसामा निर्मला रामटेके, सरपंच कुंभारटोली सुनंदा येरणे, सरपंच बाम्हणी विद्या शिंगाडे, जिल्हा स्वयं सेवी सहकारी संस्था सचिव धनराज वैद्य, मनसे तालुकाध्यक्ष मुन्ना गौळी, कुंभारटोली उपसरपंच निखील मेश्राम, समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, सचिव यादव मेश्राम उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी या देशाचा या जिल्ह्याच्या विकास साधण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांनी चालणे गरजेचे आहे. कारण बुद्धाने जगाला मानवी कल्याणाचा मार्ग दाखविला तर बाबासाहेबांनी संविधान देऊन याच देशातील प्रत्येक माणसाला प्रगतीचे मार्ग खुले केले, असे विचार प्रतिपादन केले. या वेळी केशवराव मानकर, नरेश माहेश्वरी, शारदा राजकुमार बडोले, उषा मेंढे, विश्वजीत डोंगरे, सहषराम कोरोटे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिवंगत बोधनदास रामटेके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समितीचे सदस्य राकेश बोधनदास रामटेके यांच्या वतीने २०१६ मधील १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुरस्कार राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समितीचे अध्यक्ष शिवचरण श्ािंगाडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समितीच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
प्रास्ताविक समितीचे संस्थापक सचिव यादव मेश्राम यांनी मांडले. संचालन समितीचे सदस्य राकेश रामटेके, रमण हुमे यांनी केले. आभार जनार्धन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी व समाजबांधवांनी सहकार्य केले. (तालुुका प्रतिनिधी)