सावित्रीबार्इंमुळेच महिलांना मंचावर स्थान- पुराम
By Admin | Published: January 5, 2017 12:57 AM2017-01-05T00:57:47+5:302017-01-05T00:57:47+5:30
एकेकाळी महिलांना ‘चूल आणि मूल’ याशिवाय अन्य कुठेही मानाचे स्थान नव्हते.
देवरी : एकेकाळी महिलांना ‘चूल आणि मूल’ याशिवाय अन्य कुठेही मानाचे स्थान नव्हते. परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिलांना शिक्षणापासून सार्वजनिक किंवा संघटनात्मक कार्यक्रमाच्या मंचावर मानाचे स्थान मिळाल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण माजी सभापती सविता पुराम यांनी केले.
त्या देवरी तालुका भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, नाभिक समाज संघटनेचे जिल्हा सचिव सुरेश चन्ने, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा नूतन कोवे, महामंत्री शोभा शेंडे, रोहिणी कावळे, सुनिता जांभुळकर, नगरसेविका कौशल्या कुंभरे, कांता भेलावे, प्रज्ञा संगीडवार, डिलेश्वरी बिंझाडे, रचना उजवने यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
यावेळी देवरी येथील सामाजिक कार्यकर्ता ललीता रामटेके आणि रेखा मेश्राम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक व संचालन तालुकाध्यक्षा नूतन कोवे यांनी तर आभार महामंत्री शोभा शेंडे यांनी मानले.