सक्रिय होणार गुडमॉर्निंग पथक

By admin | Published: September 19, 2016 12:27 AM2016-09-19T00:27:19+5:302016-09-19T00:27:19+5:30

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदिया नगर परिषद क्षेत्रात उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांवर आळा घालण्यात येईल.

Becoming active Gooding Squad | सक्रिय होणार गुडमॉर्निंग पथक

सक्रिय होणार गुडमॉर्निंग पथक

Next

६ पार्इंट बनविले : ६ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काम करणार १६ कर्मचारी
गोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदिया नगर परिषद क्षेत्रात उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांवर आळा घालण्यात येईल. यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून गुडमॉर्निंग पथक तयार करण्यात आले.
गोंदिया शहराला मार्च २०१७ पर्यंत घाणमुक्त (ओडीएफ) करण्यासाठी लोकांना शौचालयाचे महत्व पटवून देण्यासाठी १७ सप्टेंबरला गुडमार्निंग पथक तयार करण्यात आले. यासाठी शहरातील सहा स्थळांची निवड करण्यात आली आहे. हे पथक सकाळी ६ ते ८ या वेळेत जाऊन उघड्यावर शौच करणाऱ्यांना शौचालयाचे महत्व पटवून देणार आहे. हे सर्व ६ पथक १९ ते २० सप्टेंबर पासून आपले काम सुरू करणार आहेत. गुडमॉर्निंग पथक उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना समज देणार व त्यांना इशाराही दिला जाणार आहे. दुसऱ्यावेळी ते उघड्यावर शौचालय करताना आढळल्यास त्याला गुलाबाचे फुल देऊन इशारा दिला जाणार आहे. परंतु तिसऱ्यांदा उघड्यावर शौच करताना आढळला तर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

या परिसरावर करडीनजर
प्रशासनिक अधिकारी सी.ए.राणे यांच्या नेतृत्वात सूर्याटोला, बांधतलाव व मोतीनालासाठी तयार करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकात जसवंत महावत, राजेश खांडेकर, प्रकाश कोरेमारे यांचा समावेश आहे. विजयनगर रिंग रोड करीता पर्यवेक्षक आर. लिमये यांच्या नेतृत्वात राजू शेंद्रे, उमेश छडीमलक, सम्मी शेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. संजयनगर, छोटा गोंदियासाठी आरेखक संतोष ठवरे यांच्या नेतृत्वात राजा करियार, प्रमोद सांडेकर, सुशांत राणे काम करतील. श्मशानघाट, पिंडकेपार परिसरात कनिष्ठ अभियंता कावळे यांच्या नेतृत्वात मदन बघेले, उपेंद्र दीप, राम कुमार, गौतमनगर, झोपला हनुमान, रेल्वे लाईन परिसरात वरिष्ठ लिपिक शेंडे यांच्या नेतृत्वात मदन अरखेल व योगेश रगडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. हरिकाशी नगर, सुंदरनगर व कुंभारेनगरासाठी कनिष्ठ अभियंता बिसेन यांच्या मार्गदर्शनात राजेश शेंद्रे व राजेश बैरीसाल काम करणार आहेत.

Web Title: Becoming active Gooding Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.