कोराेना रुग्णांसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातही बेड्स उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:31 AM2021-03-23T04:31:26+5:302021-03-23T04:31:26+5:30
गोंदिया : जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील शासकीय ...
गोंदिया : जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयातील बेड्स फुल होत असल्याचे चित्र आहे. रुग्ण संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता आरोग्य विभागाने कोविड केअर सेंटर सुरु केले असून, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील १०० खाटांचे कक्ष सुरु करण्याची तयारी केली जात आहे. सद्यस्थितीत सरकारी रुग्णालयात ११८, तर शहरातील खासगी रुग्णालयात १६२ बेड्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४९७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, यापैकी ३७८ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर ११९ रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल आहेत. काेरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खासगी रुग्णालयांनासुध्दा बेड्स राखीव ठेवण्याच्या सूचना आराेग्य विभागाने केल्या आहेत.
..........
रुग्ण वाढताच काढणार आदेश
खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांसाठी काही प्रमाणात बेड्स राखीव ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना दिले होते. मात्र, मध्यल्या काळात रुग्ण संख्या कमी झाल्याने याकडे दुर्लक्ष झाले होते. पण, आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांना यासंदर्भात निर्देश देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
........
खासगी रुग्णालयात काय दर
ऑक्सिजन ७५००
.....
आयसीयूृ
९५००
......
व्हेंटीलेटर आयसीयू
१०५००
..............
अशी आहे बेड्सची आकडेवारी
कोरोना रुग्णांसाठी शहरात उपलब्ध बेड्स ६४१
उपलब्ध बेड्स २८०
.......
शासकीय रुग्णालय एकूण बेड्स ४१०
एकूण उपलब्ध असलेले बेड्स : २१०
...............
खासगी रुग्णालयात एकूण बेड्स :२३१
एकूण उपलब्ध बेड : १६२
...............
ऑक्सिजन : २३२
व्हेंटीलेटर : १५८
आयसीयू : १६२
............