विना अनुदानित शिक्षकांचे भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:06 PM2019-08-16T22:06:03+5:302019-08-16T22:08:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित, अघोषीत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक बिनपगारी काम ...

Begging for non-subsidized teachers | विना अनुदानित शिक्षकांचे भीक मांगो आंदोलन

विना अनुदानित शिक्षकांचे भीक मांगो आंदोलन

Next
ठळक मुद्देरस्ता रोकोनंतर स्थिती जैसे थे : पाच वर्षापासून केवळ आश्वासनावर बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित, अघोषीत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक बिनपगारी काम करीत आहेत. त्यांना वेतन देण्यात यावे या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक कृती समिती गोंदिया जिल्हा शाखेने शुक्रवारी (दि. १६) गोंदिया शहरात भिक मांगो आंदोलन केले.
आपल्या मागण्यांना घेऊन माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ वर्षापासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांचा आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक कृती समिती गोंदिया जिल्ह्यातर्फे शासन स्तरावर २२१ आंदोलने करण्यात आली. आता शेवटचे २२२ वे बेमुदत शाळाबंद धरणे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरु आहे.
शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई येथील अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषीत केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना अघोषीत ठेवून या सर्वाची म्हणजे १४६+१६५६ शाळाची अनुदानाची गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुध्दा केली.त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले असून आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे.या कामासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावा.शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत पगार जमा करुन वेतन देण्याची मागणी केली आहे.अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. तसेच याला महाराष्ट्र शासनच पूर्णपणे जबाबदार राहील. अघोषीत उच्च माध्यमीक शाळांची घोषणा करुन अनुदान जाहीर करावे, या मागणीला घेऊन गोंदिया जिल्हा कृती समितीचे प्रा.के.बी.बोरकर, प्रा.पी.पी.मेहर, व्ही.आर.पोगळे, जे.बी.पटले, ए.एन.कठाणे, आर. एस. जगणे, एस.डी. येळे, एम.टी. चौरे, एम.ए.उके, एम.एल.पटले, प्रतीक मेंढे यांनी शुक्रवारी फुलचूर परिसरात भीक मांगो आंदोलन केले.
 

Web Title: Begging for non-subsidized teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक