खोटे स्वप्न दाखविण्यात नाही कामावर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:37 PM2019-01-20T22:37:05+5:302019-01-20T22:38:12+5:30

आमच्या भूमिपूजनांवर टीका करणारे भाजपचे नेते आता स्वत: हातात कुदळ, फावडा घेवून गावोगावी जात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले, रस्त्यांचे बांधकाम केले, युवांसाठी रोजगारोन्मुख शिक्षणाची सोय केली.

Believing the false dream is not shown | खोटे स्वप्न दाखविण्यात नाही कामावर विश्वास

खोटे स्वप्न दाखविण्यात नाही कामावर विश्वास

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम गोंडीटोला व गर्रा येथे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमच्या भूमिपूजनांवर टीका करणारे भाजपचे नेते आता स्वत: हातात कुदळ, फावडा घेवून गावोगावी जात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले, रस्त्यांचे बांधकाम केले, युवांसाठी रोजगारोन्मुख शिक्षणाची सोय केली. मात्र भाजपायींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे खोटे स्वप्न दाखविले. कारण, आम्ही खोटे स्वप्न दाखविण्यावर नाही तर कामावर विश्वास ठेवत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम गोंडीटोला व ग्राम गर्रा येथील रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांच्या माध्यमातून गोंदिया विधानसभा क्षेत्रात ज्याप्रकारे विकासकामे केली जात आहेत तेवढी कामे अन्य कोणत्याही क्षेत्रात होत नसल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापची चमन बिसेन, विजय लोणारे, प्रकाश रहमतकर, गेंदलाल शरणागत, मनीष मेश्राम, सुजीत येवले, कैलाश कुंजाम, सविता न्यायकरे, बबलू निरंकारी, अंकेश हरिणखेडे, विनोद पटले, गिरजाशंकर कुंजाम, आनंद लांजेवार, कन्हैयालाल वासनिक, बालचंद न्यायकरे, डिगंबर उईके, मुन्नालाल कुंजाम, ओंकार कुंजाम, श्यामलाल कुंजाम, ललीत पंधरे, रविंद्र गजापुरे, रत्नदीप वासनिक, रंजीत वासनिक, नैनसिंग कुंजाम, शिवाजी कोकोडे, छबीलाल कुंजाम, तारा मसराम, लखनलाल बावनथडे, रमेश बावनथडे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.
 

 

Web Title: Believing the false dream is not shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.