पंचायत समितीत ई-गृहप्रवेश कार्यशाळेत लाभार्थ्यांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:25+5:302021-06-17T04:20:25+5:30
यावेळी गटविकास अधिकारी झेंड.डी. टेंभरे, सप्रअ संजय बनकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.बी. पटले, ए.टी. टेंभरे, आर.एस. बोपचे, डाटा एन्ट्री ...
यावेळी गटविकास अधिकारी झेंड.डी. टेंभरे,
सप्रअ संजय बनकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.बी. पटले, ए.टी. टेंभरे, आर.एस. बोपचे, डाटा एन्ट्री ऑपरेटर अरुण बिसेन, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नरेंद्र पटले, विशाल पटले, ओमेश रहांगडाले, संजय बिसने, स्मीथ सांगोळे उपस्थित होते.
सन २०१९-२० या वर्षात पंतप्रधान घरकुल योजना, शबरी आवास योजना, रमाई घरकुल योजना यासारख्या योजना राबविण्यात आल्या. यात उत्कृष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांचे सत्कार ई-गृहप्रवेश कार्यशाळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आयोजित केली होती. आपले हक्काचे घर असावे यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला. यात अनेक लाभार्थ्यांनी उत्कृष्ट बांधकाम केले आहे. त्यांचा ई-गृहप्रवेश या कार्यक्रमाद्वारे सत्कार करण्यात आला.
.............
या लाभार्थ्यांचा केला सत्कार
पंचायत समिती, गोरेगाव येथे या कार्यशाळेचे आयोजन करून पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभार्थी घनश्याम चौधरी, डिलेश्वर पंधराम, शबरी आवास योजनेचे लाभार्थी हिरालाल, राऊत, देवका राऊत, संपत राऊत, सुकचंद राऊत, रमाई घरकुल योजनेचा लाभार्थी युवराज सोनटक्के यांचा सत्कार करुन ई-गृहप्रवेश करण्यात आला.