निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:48+5:302021-05-09T04:29:48+5:30
बिरसी फाटा : शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ निराधार योजनेचे लाभार्थी अडचणीत आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने त्यांचे ...
बिरसी फाटा : शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ निराधार योजनेचे लाभार्थी अडचणीत आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने त्यांचे अनुदान रखडलेे आहेत. सध्या लॉकडाऊन असून अशात अर्थसहाय्य मिळत नसल्याने निराधारांची होरपळ होत आहे. शासनाच्यावतीने निराधार योजनेचा लाभार्थ्यांना वेळेपूर्वी हृयात प्रमाणपत्र आधारकार्ड व इतर कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचना तहसीलदारांनी केल्या आहेत. पण तहसील कार्यालयाने गावपातळीवरच कागदपत्रे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच कमलेश पारधी यांनी केली आहे.
सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. यामुळे उपाययोजनेचा भाग म्हणून शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले असून १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामे केली जात आहेत. परिणामी कामासाठी गेलेल्या नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. याचा फटका विविध अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना बसत आहे. आधार कार्ड, हृयात प्रमाणपत्र ज्यांनी जमा केले नाही त्यांचे अनुदान रखडले आहे. यामुळे गावपातळीवर अत्यावश्यक कागदपत्र तलाठ्याकडे जमा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कवलेवाडाचे सरपंच किरणकुमार पारधी यांनी शासनाकडे आहे. गावस्तरावर वाहनांची सोय नसल्याने निराधार लाभार्थी कसे काय तहसील कार्यालय गाठणार असा उपस्थित केला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समस्या लक्षात घेऊन विशेष अर्थसहाय्य लाभार्थ्यांकडून कागदपत्रे स्थानिक स्तरावर स्वीकारावी, अशी मागणी पारधी यांनी केली आहे.