निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:49+5:302021-05-06T04:30:49+5:30

गोंदिया : संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र ३० जून या कालावधीत गोंदिया ...

Beneficiaries of Niradhar Yojana will have to submit a survival certificate | निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र

Next

गोंदिया : संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र ३० जून या कालावधीत गोंदिया तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र सादर करावे. या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलैपासून अर्थसहाय्य बंद करण्यात येईल, असे गोंदिया तहसीलदार यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन निर्णय २० ऑगस्ट, २०१९ तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या शासन निर्णय ३ मे, २०२१ नुसार या गोंदिया तहसील कार्यालयास संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या अनुषंगाने गोंदिया तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत हयात असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलैपासून अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणारे लाभार्थ्यांनी हयात असल्याबाबत प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, आधारकार्ड, तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास सध्याच्या कालावधीतील सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र, परिशिष्ट-१० मधील तहसीलदार यांचेकडील उत्पन्न प्रमाणपत्रासह संबंधित तलाठी यांच्यामार्फत सादर करण्यात यावे, तसे न केल्यास जुलैपासून संबंधितांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल,असे पत्र तहसीलदार गोंदिया यांनी काढले आहे.

Web Title: Beneficiaries of Niradhar Yojana will have to submit a survival certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.