४८८ निराधारांना बालसंगोपन योजनेचा लाभ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:52+5:302021-04-16T04:28:52+5:30
गोंदिया : निराश्रित, निराधारांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. गोंदिया जिल्ह्यातील ४८८ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. ...
गोंदिया : निराश्रित, निराधारांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. गोंदिया जिल्ह्यातील ४८८ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. जिल्हास्तरावर ४६८ व संस्थास्तर २० लाभार्थी असे एकूण ४८८ लाभार्थी आहेत. यापैकी ३२६ लाभार्थींचे दूरध्वनी क्रमांक महिला व बाल कल्याण विभागाकडे उपलब्ध आहेत. ३१६ लाभार्थींशी संपर्क साधून कोविड-१९च्या अनुषंगाने कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील बालगृहात असलेले गोंदिया जिल्ह्याचे ८ प्रवेशित सीडब्लूसीच्या आदेशान्वये त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर ८ प्रवेशित व त्यांच्या पालकांशी नियमितपणे भ्रमणध्वनीद्वारे बालकांच्या प्रकृतीविषयी तसेच कोरोना विषाणूसंदर्भात घ्यायची काळजी, याबाबत संपर्क साधण्यात आला. पोक्सो कायद्यांतर्गत पीडितांची गृहचौकशी व समुपदेशन करण्यात आले. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या ७ बालकांची सामाजिक तपासणी करण्यात आली. बालके, अनाथ, सोडून दिलेले, काळजी व संरक्षणाची गरज असणारी मुले, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली बालके, बालविवाह याबाबत माहिती घेण्याचे काम महिला विकास विभाग करीत आहे.
बॉक्स
६८४ गावांत ग्राम बाल संरक्षण समित्या
महिला व बाल विकास विभागाने गोंदिया जिल्ह्यामध्ये ५४५ ग्रा.पं.असून, ८६६ महसुली गावे आहेत. ६८४ महसुली गावांत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचे ठराव प्राप्त झाले आहेत. उर्वरित १८२ महसुली गावांमध्ये पुढील होणाऱ्या ग्रामसभांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.