शासनाच्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:59 AM2018-10-18T00:59:13+5:302018-10-18T00:59:56+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देवून संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली. परंतू स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देवून संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली. परंतू स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. सफाई कर्मचारी साफसफाई करु न आपल्या कर्तव्याचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे हे आपले कर्तव्य समजून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न शासनाच्या विविध योजनांचा लाभ सफाई कामगारांपर्यंत पोहोचवा,असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिल्
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१७) राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे व निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक उपस्थित होते. हाथीबेड म्हणाले, नगर पालिकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे. सफाई कर्मचाºयांच्या पाल्ल्यांना शैक्षणकि पात्रतेच्या आधारावर नगर पालिकेनी सेवेत सामावून घ्यावे. सेवा ज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी,असे सांगितले. प्रारंभी मागील बैठकीच्या इतिवृत्तावर यावेळी चर्चा करण्यात आली.
हाथीबेड यांनी विभागनिहाय सफाई कामगारांची संख्या व समस्यांची माहिती जाणून घेतली. सफाई कर्मचाऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचवावा यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत २५ वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना घरकूल देण्याची योजना आहे. त्यानुसार नगरपालिकने २५ वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्याची सूचना यावेळी दिल्या. सामान्य रु ग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. समाज कल्याण विभागाने सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना वसतिगृहात प्राधान्याने प्रवेश देवून त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी असावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला नगरपरिषद, समाज कल्याण, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस गोंदिया नगरपरिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी विजय देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रु खमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विनोद ठाकुर व लिड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप सिल्हारे उपस्थित होते.