ज्ञान व अनुभवाचा लाभ यशासाठी

By Admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:07+5:302016-04-03T03:51:07+5:30

प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे.

For the benefit of knowledge and experience | ज्ञान व अनुभवाचा लाभ यशासाठी

ज्ञान व अनुभवाचा लाभ यशासाठी

googlenewsNext

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : उपायुक्तपदी बढती झालेल्या डीपीओंचा सत्कार
गोंदिया : प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे. विषयाचे सखोल ज्ञान आणि कामाचा दांडगा अनुभव असेल तर अधिकारी यशस्वी होतो. घाटे यांच्याकडे हे गुण असल्यामुळे ते यशस्वी अधिकारी ठरले, असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे यांचे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपायुक्त (नियोजन) म्हणून पदोन्नतीने स्थानांतरण झाले. त्याबद्दल त्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते.
या वेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सत्कारमूर्ती बकूल घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी ठाकरे, शिंदे, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी भूते, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन अधिकारी चांगला असेल तर कामात यश मिळते. विविध यंत्रणांना दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च व्हावा यासाठी नियोजन अधिकाऱ्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु न तो निधी वेळेतच खर्च झाला पाहिजे, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष असावे. घाटे यांनी प्रत्येक जिल्हा नियोजन समितीची सभा आपले कौशल्य वापरु न व विषयांची योग्यप्रकारे मांडणी करु न यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्यालयात काही पदे रिक्त असतानादेखील त्यांनी चांगले काम केले आहे. जिल्हा नियोजन समतीच्या निधीचा त्यांनी चांगल्याप्रकारे विनियोग केला आहे. मार्च २०१६ अखेर १०० टक्के डीपीडीसीचा निधी त्यांच्या माध्यमातून यंत्रणांनी खर्च केला आहे. घाटे यांनी त्यांच्या कार्यालयाचे प्रभावी नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना घाटे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यालयातील सहकाऱ्यांमुळे चांगले काम करता आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या यादेखील यशस्वीपणे पार पाडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करताना विविध यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी व निधी वेळेवर खर्च करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.
मोहिते म्हणाले की, कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत करु न काम केले तर चांगल्याप्रकारे आपण यशस्वी होतो, हे घाटे यांनी सिद्ध करु न दाखिवले, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घाटे यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून रूजू झालेले तेजबहादूर तिडके यांच्याही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.
या वेळी लोणकर, तिडके, भूत, बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माला जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन कार्यालय, सांख्यिकी कार्यालय, रोहयो कार्यालय, भूसंपादन कार्यालय, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी कडू यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: For the benefit of knowledge and experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.