गरजूंना योजनेचा लाभ मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:51 PM2018-09-24T21:51:05+5:302018-09-24T21:51:23+5:30

केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्र म देशभरात राबविण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात केला. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करून गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.

Benefit of the scheme to the needy | गरजूंना योजनेचा लाभ मिळावा

गरजूंना योजनेचा लाभ मिळावा

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्र म देशभरात राबविण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात केला. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करून गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात रविवारी (दि.२३) आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते होते. या वेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरीश बैजल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमादे खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, नगरसेविका भावना कदम उपस्थित होते.
बडोले म्हणाले, ही योजना नि:शुल्क आहे. यात केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरणार आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रती वर्ष प्रती कुटूंब रु पये १ लाख ५० हजार रुपये एवढ्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार घेता येईल. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा रु .२.५० हजार रुपये लक्ष एवढी आहे. या योजनेअंतर्गत सध्या शासकीय रु ग्णालयामधून वैद्यकीय सेवा उपलब्ध करु न देण्यात येत आहे. लाभार्थी कुटूंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतची शस्त्रक्रिया व उपचार मान्यता प्राप्त खासगी व शासकीय रुग्णालयात घेता येणार आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत लाभार्थ्यांना ई-कार्डस वाटप करण्यात आले. कार्यक्र माचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी मांडले. संचालन डॉ. श्रध्दा सपाटे यांनी केले तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी मानले.

Web Title: Benefit of the scheme to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.