दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:37 AM2017-10-29T00:37:19+5:302017-10-29T00:37:52+5:30
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप केले जाते. या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित केले जाणार आहे.
स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणाºया अंत्योदय व दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. पालकमंत्री बडोले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवाई, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारी, गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांनी, अन्न ही मुलभूत गरज आहे. या योजनेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांची गरज पूर्ण करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभापासून गरजू व पात्र असलेला लाभार्थी हा वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात ई-पॉसच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण होत असल्यामुळे योग्य लाभार्थ्यांना धान्य मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना प्रभावीपणे कशा मिळतील याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ७७ हजार १८१ अंत्योदय योजनेचे लाभार्थी असून त्यांना २ रु पये प्रति किलो दराने तांदूळ व ३ रु पये प्रति किलो दराने गहू देण्यात येतो. एप्र्रिल २०१७ पासून ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे.