शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मिळणार लाभ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:03+5:302021-06-06T04:22:03+5:30
बोंडगावदेवी : खरीप हंगामात धानाची लागवड करताना, बियाणांची उगवण क्षमता पाहुनच बियाणे खरेदी करावे. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ ...
बोंडगावदेवी : खरीप हंगामात धानाची लागवड करताना, बियाणांची उगवण क्षमता पाहुनच बियाणे खरेदी करावे. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. परंतु ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असून सोडतीमध्ये निवड झालेली नाही, अशा वंचित शेतकऱ्यांना देखील पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ दिला जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा अभियान भात व कडधान्य खरिप हंगाम अंतर्गत भात पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार सोडत काढण्यात आली. सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असून सोडतीमध्ये निवड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वाटपात मागणीनुसार लाभ देण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी लांजेवार यांनी कळविले आहे. ज्यांनी अजुनपर्यंत ऑनलाईन अर्ज केले नाहीत त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी मुभा दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केले त्या सर्वांना लाभ देण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी लांजेवार यांनी कळविले आहे.