शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांच्या दारापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:26 PM2018-04-01T22:26:57+5:302018-04-01T22:26:57+5:30

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राहणाऱ्या सामान्यजनांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांचा सर्वागिण विकास साधावा यासाठी राज्यशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. समाजातील दिव्यांग महिला पुरुषांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

Benefits of Government Schemes | शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांच्या दारापर्यंत

शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांच्या दारापर्यंत

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : लाभार्थी दिव्यांगांना कुलर भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राहणाऱ्या सामान्यजनांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांचा सर्वागिण विकास साधावा यासाठी राज्यशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. समाजातील दिव्यांग महिला पुरुषांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. गावातील शेवटच्या घटकातील वंचितास शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
इंजोरी-बोरटोला येथील ग्रामपंचायतच्यावतीने ३ टक्के निधीतून दिव्यांग लाभार्थ्याना कुलर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, ग्रामपंचायत उपसरपंच दिपीका रहेले, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, पोलीस पाटील डाकराम मेंढे, माजी जि.प.सदस्य मधुकर मरस्कोल्हे, ग्रा.पं.सदस्य नलु शेंडे, देवयानी मेश्राम, सखाराम सयाम उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, दिव्यांगाना स्वयंपूर्ण करुन समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळावी, त्यांचा आदर व्हावा यासाठी त्यांच्या दारापर्यंत विविध योजना पोहचविण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगीतले. ग्रामीण भागात विकासाची गंगा येवून सामान्य माणूस मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामाची गती वाढविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शांता घोरमारे, चंद्रकुमार भेंडारकर, डुलन मेंढे, तिरसागर हेमने, राष्ट्रपाल शेंडे, सुनंदा रहेले, शंकर हुकरे, रोहित तवाडे, भिमराव शिवणकर, गुलाब शेंडे, हिरकन्या खंडाईत, पुष्पा दडमड या १२ दिव्यांगांना नामदार बडोले यांच्या हस्ते कुलरचे वाटप करण्यात आले. संचालन मोहन भेंडारकर यांनी केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी जमईवार यांनी मांडले. आभार ग्रामसेवक गोमासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दिपंकर उके, पृथ्वीराज भेंडारकर, दिलेश मेश्राम, लंकेश मेंढे, राधेशाम हुकरे, जयंत हेमने, दिलीप हुकरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Benefits of Government Schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.