सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:20 PM2018-10-01T21:20:20+5:302018-10-01T21:20:40+5:30

वैयक्तीक लाभाच्या प्रत्येक योजना सर्वांपर्यंत पोहचल्या तरच शासनाचा उद्देश पूर्ण होणार. गोर-गरिबांसाठी शासन योजना बनविते. मात्र या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात अधिकारी उदासीन आहेत. शासनाच्या या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत वैयक्तीक लाभ योजनांच्या शिबिरात ते बोलत होते.

The benefits of the schemes reach the common man | सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचावा

सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचावा

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : आसोली येथील वैयक्तिक लाभाच्या योजनांचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वैयक्तीक लाभाच्या प्रत्येक योजना सर्वांपर्यंत पोहचल्या तरच शासनाचा उद्देश पूर्ण होणार. गोर-गरिबांसाठी शासन योजना बनविते. मात्र या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात अधिकारी उदासीन आहेत. शासनाच्या या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत वैयक्तीक लाभ योजनांच्या शिबिरात ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, प्रत्येकापर्यंत योजना पोहचविण्यासाठी आमदारांच्या मार्गदर्शनात शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे समाजातील अंतीम व्यक्तीपर्यंत या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगीतले.
शिबिरात आमदार अग्रवाल यांनी अर्जदारांच्या समस्या ऐकून त्यांना सोडविण्याचे निर्देश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. शिबिरात सर्वाधीक तक्रारी रेशनकार्ड संबंधी प्राप्त झाल्या. तर २५० हून अधिक अर्जदारांनी विविध योजनांसाठी अर्ज सादर केले.
यात ८० उत्पन्नाचे दाखले, १५ संजय गांधी व श्रावण बाळ योजना, ३४ रेशनकार्ड, २२ मतदानकार्ड संबंधी अर्ज आले असून १७ प्रमाणपत्र शासकीय वैद्यकीय अधिकाºयांनी दिले.
शिबिरासाठी मिथुन पटेल, चमन बिसेन, चैतन्य बहेकार, बंटी भेलावे, विठ्ठल करंडे, रवि तरोणे, नामदेव वैद्य, रणजीत गणवीर, हरिचंद कावळे यांनी सहकार्य केले.
अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई
शिबिरात आमदार अग्रवाल यांनी, गोर-गरिबांना वैयक्तीक लाभाच्या योजना देण्यासाठी अधिकाºयांनी शक्य ते प्रयत्न करावे असे सांगीतले. तसेच एखाद्याही अर्जदाराला टोलविण्याचे किंवा त्रास देण्याचे काम केल्यास त्या अधिकाºयांवर कठोर कारवाई केली जाणार असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: The benefits of the schemes reach the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.