मजुरांना कल्याणकारी योजनांचा लाभ
By admin | Published: October 17, 2016 12:34 AM2016-10-17T00:34:46+5:302016-10-17T00:34:46+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत गोंगले व राजगुडा येथे ‘एक दिवस
महत्व मनरेगाचे : गोंगले व राजगुडा येथे ‘एक दिवस मजुरांसोबत’
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत गोंगले व राजगुडा येथे ‘एक दिवस मजुरांसोबत’ या संकल्पनेंतर्गत ग्राम रोजगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आम आदमी विमा योजना व कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची माहिती मजुरांना देण्यात आली. ज्या मजुरांनी १०० दिवस काम केले अशा मजुरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार मेश्राम यांनी सांगितले, महसूल विभागाकडून मजुरांना आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, उत्पन्नाचे दाखले, सातबारा देण्यात आले. सन २०१६-१७ मजुरांची तरतूद व नियोजन आराखडा सरपंचाना देण्यात आला. सहायक कार्यक्र म अधिकारी भारत बोदेले यांनी मनरेगाविषयी ग्रामस्थांना वैयक्तीक शौचालय, सिंचन विहिरी, गुरांचे गोठे, शोष खड्डे व कृषी कामांचे ग्रामस्थांना महत्व पटवून दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत गोंगले व राजगुडा येथे एक दिवस मजुरासोबत या संकल्पनेंंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी सरिता कापगते होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य शीला चव्हाण, पं.स. सडक-अर्जुनी उपसभापती विलास शिवणकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे उपस्थित होते.
मनरेगा अंतर्गत एक दिवस मजुरासोबत उपस्थित राहून ग्राम रोजगार दिवसाचे महत्व जाणून घेण्याच्या दृष्टीने शासकीय योजनेची माहिती सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगले व राजगुडा या ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिली.
कार्यक्रमाला सहायक गटविकास अधिकारी झेड.डी. टेंभरे, पुष्पा पंचभाई, सरपंच दामिनी गावळ, उपसरपंच ए.एम. लेदे, एम.एस. धोंगळे, विस्तार अधिकारी एस.आय. वैद्य, सचिव पुष्पा चाचेरे, डी.जी. कोटांगले, तांत्रिक अधिकारी पी.के. कापगते तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व रोजगार सेवक उपस्थित होते.
राजगुडा हे गाव जंगलव्याप्त असून आदिवासी बांधवांची लोकसंख्या जास्त आहे. राजगुडा व गोंगले जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये घेण्यात आले. या गावामध्ये विविध कामाचे नियोजन करण्यात आले. प्रास्ताविक, संचालन व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक व्ही.के. गोबाडे यांनी मानले. (प्रतिनिधी)