समाजभवनासाठी सर्वोतोपरी मदत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:43 PM2018-12-26T21:43:58+5:302018-12-26T21:44:12+5:30
आदिवासी समाजासाठी गोंदिया येथे हक्काचे समाज भवन उभारण्याकरीता पूर्ण मदत करु तसेच आदिवासी समाजात इतर बोगस जातीचा समावेश करण्यात येऊ नये, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
्नगोंदिया : आदिवासी समाजासाठी गोंदिया येथे हक्काचे समाज भवन उभारण्याकरीता पूर्ण मदत करु तसेच आदिवासी समाजात इतर बोगस जातीचा समावेश करण्यात येऊ नये, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
गोंडवाना मित्र मंडळ, गोंदियातर्फे आदिवासी उपवर-वधू परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुर्जर क्षत्रिय समाजवाडी गोंदिया येथे रविवारी (दि.२३) करण्यात आले होते. या वेळ मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. मधुकर कुकडे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी आ. राजेंद्र जैन व आदिवासी नेते एन.डी.किरसान उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले, शासनातर्फे आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून त्यांचा सर्वांगिन विकास साधण्याची ग्वाही दिली. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या दरम्यान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता उपविभागीय अधिकारी रविंद्र राठौड, दिपक बहेकार, देवेंद्र रोडगे व राजकुमार हिवारे यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष नॅशनल स्कील फेडरेशन करण टेकाम यांनी केले. संचालन मिनाक्षी वट्टी यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येत आदिवासी बांधव उपस्थित होते.