उत्तम आरोग्य सेवा प्रत्येकाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:25 PM2018-06-14T20:25:25+5:302018-06-14T20:25:25+5:30
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. यामुळेच रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसोबतच खमारी येथील अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. यामुळेच रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसोबतच खमारी येथील अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. बाई गंगाबाई रूग्णालयातील खाटांची संख्या वाढविली असून केटीएस रूग्णालयात सिटीस्कॅन मशीनसाठी निधी मंजूर करवून घेतला. उत्तम आरोग्य सेवा प्रत्येकाचा हक्क असून ही सेवा उपलब्ध करवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.
तालुक्यातील ग्राम सावरी येथे ५० लाख रूपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कॉंँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे उपस्थित होते. याप्रसंगी सभापती दोनोडे यांनी, आमदार अग्रवाल हे क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करतात. यातूनच तालुक्यात नऊ उपकेंद्र स्थापन करण्यात आले असून आरोग्य सेवा पुरविली जात असल्याचे मत व्यक्त केले. पंचायत समिती सभापती हरिणखेडे यांनी, विकासाच्या प्रत्येकच क्षेत्रात गोंदिया तालुका अव्वल असल्याचे सांगीतले. याप्रसंगी चमन बिसेन, उषा मेंढे, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, योगेश अग्रवाल, कमलेश्वरी लिल्हारे, रमेश लिल्हारे, नरेंद्रसिंग चिखलोंडे, डिलेश्वरी पटले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.