सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:07+5:302021-09-19T04:30:07+5:30

गोंदिया : ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. झटपट पैसा कमविण्याच्या नादात लोक एक दुसऱ्याला गंडा घालत ...

Beware, cheating can happen under the guise of festival offers! | सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक!

सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक!

Next

गोंदिया : ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. झटपट पैसा कमविण्याच्या नादात लोक एक दुसऱ्याला गंडा घालत आहेत. आपल्या मोबाईलवर कॉल किंवा मॅसेज करून सध्या सुरू असलेल्या फेस्टिव्हलचे ऑफर्स देऊन आपल्याला सहजरित्या गंडा घालतील. यापासून सावधान राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तीने फोन करून आपल्याला फेस्टिव्हल ऑफर्स दिला तर त्या ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका अन्यथा आपण गंडविले जाणार हे निश्चित. आपल्याला विविध साहित्य घेण्यावर इतकी सूट आहे यासाठी असे करा, तसे करा असे सांगून आपल्याला भूलथापा देतील आणि लुटतील. आपली नजर चुकवून क्षणार्धात आपल्या खात्यातील सर्व रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेतील. आपण कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.

.........................................

अशी केली जाऊ शकते फसवणूक

१) आपल्या मोबाईलवर कॉल करून सणासुदीच्या नावावर ऑफर सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन प्रोसेस करा, असे सांगून ती ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी ग्राहकाला वारंवार सूचना देऊन त्यांच्याकडून पैसे वळती करण्याची प्रोसेस करवून घेतली जाते. छोट्या खोट्या आमिषामुळे मोठी रक्कम आपली ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यात वळवून घेतात.

..........................

२) पैसे वळती करणारी व त्यात ऑफर नमूद असलेली लिंक लोकांना पाठविली जाते. वेगवेगळी लिंक पाठवून त्या मोबाईलच्या माध्यमातून लिंक वरून माहिती अपलोड केली जाते. प्रोसेस करण्याच्या नावावर गोळा केलेल्या माहितीच्या आधारे जाळ्यात अडकलेल्या ग्राहकाच्या खात्यातून पैसे गायब केले जातात.

...................................

ही घ्या काळजी

१) अनोळखी व्यक्तीचा ऑफर देणारा कॉल आल्यास त्यावर माहिती देऊ नका, ओटीपी क्रमांक सांगू नका. फसव्या कॉलपासून सावध राहा. आपल्याला ई-मेल किंवा मोबाईलवर संदेश आल्यास डिलिट करा, प्रतिसाद देऊ नका.

....

२) कुणालाही आपली फायनान्सियल माहिती देऊ नका. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आलेली अनोळखी लिंक ओपन करू नका. संभाषण झाल्यास आपल्या संदर्भातली कुठलीही माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ नका अन्यथा आपली फसवणूक होईल.

......

३) सणासुदीचे दिवस असल्याने सणाचे आमिष देऊन अनेक महिला, पुरुषांची फसवणूक केली जाते. लोकांना महागड्या वस्तू व मोठी ऑफर असल्याचे आमिष देऊन त्यांची फसवणूक केली जाते.

........

४) चुकीच्या पद्धतीने करून लिंक किंवा ओटीपीच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या साह्याने मदत आपल्या खात्यातील पैसे चोरटे आपल्या खात्यात वळवतील. आपली फसवणूक होऊ नये म्हणू दक्ष राहावे.

....................

जानेवारी-०१

फेब्रुवारी -००

मार्च-०१

एप्रिल-००

मे-००

जून-०१

जुलै-०२

ऑगस्ट-२

Web Title: Beware, cheating can happen under the guise of festival offers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.