भंडारा जिल्ह्यात १३ लाख खर्चून झाडांना केवळ घोटभर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:48 AM2017-11-06T11:48:00+5:302017-11-06T11:54:22+5:30

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा शिवारात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी घोटभर पाणी दिले जात आहे. त्यामुळे अनेक झाडे भुईसपाट झाले आहेत.

Bhandara Trees gets few milliliter water worth rs 13 lacs | भंडारा जिल्ह्यात १३ लाख खर्चून झाडांना केवळ घोटभर पाणी

भंडारा जिल्ह्यात १३ लाख खर्चून झाडांना केवळ घोटभर पाणी

Next
ठळक मुद्देअनेक झाडे भुईसपाट रनेरा शिवारात शासकीय निधीचा सावळागोंधळ

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा शिवारात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी घोटभर पाणी दिले जात आहे. त्यामुळे अनेक झाडे भुईसपाट झाले आहेत. १३ लाख खर्चाचे नियोजन करताना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कोसो दूर आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा ते मोहगाव (खदान) गावापर्यंत सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या वृक्ष लागवड व वृक्षांचे संगोपन करण्यासाठी रोहयो अंतर्गत १३ लाख ५६,५३३ रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. २ कि.मी. अंतर पर्यंत वृक्ष लागवडीचे नियोजन असताना हरदोलीत मोहगाव (खदान) गावापर्यंत वृक्ष लागवड करताना डच्चू देण्यात आला आहे. दीड कि.मी. अंतराचे मार्गाला वृक्ष लागवडीमधून बगल देण्यात आला आहे. रनेरा ते रनेरा गावाचे हद्दीत अर्धा कि.मी. अंतरापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली.
दरम्यान अर्धा कि.मी. अंतरापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी संगोपनअभावी वृक्ष लागवडीचा सांगाडा शिल्लक आहे. अनेक झाडे जिवंत नाही. काही झाडे जिवंत असली तरी भूईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. काही झाडे अंतिम घटका मोजत असून या झाडांना बॉटलने पाणी दिले जात आहे. याशिवाय झाडांची सुरक्षा करण्यासाठी फाद्यांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
यासाठी निधी खर्च करण्यात येत आहे. जे झाडे पाण्याअभावी कोमेजले आहेत अशा जागेत आणि खड्ड्यात नवीन झाडांची लागवड केली जाते. परंतु ही झाडे निर्जीव ठरत आहेत. यामुळे लाखो रूपयाचा निधी असताना उपक्रम कोसो दूर गेल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Bhandara Trees gets few milliliter water worth rs 13 lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.