भावेश जनबंधू आकाशवाणीवर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:37+5:302021-05-10T04:28:37+5:30
बाराभाटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आकाशवाणी नागपूरच्या वतीने ...
बाराभाटी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आकाशवाणी नागपूरच्या वतीने ‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रम प्रसारित करण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलके करण्याचे काम आकाशवाणी नागपूर करीत आहे. या मुलाखतीद्वारे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथील इयत्ता सहावीच्या विद्यार्थी भावेश भीमराव जनबंधू याची निवड करण्यात आली.
आकाशवाणीवर ‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रमांतर्गत १४२ व्या भागात सहभागी होण्याकरिता गोंदिया जिल्ह्यातून निवड झाली.
ही मुलाखत १३ मे रोजी सकाळी १०:३५ वाजता आकाशवाणी नागपूरच्या केंद्रावरून प्रसारित होणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनावर आधारित प्रश्नांची उत्तरे भावेशने दिले. विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी होणाऱ्या भावेशने मोरगाव गावची मुलाखतीद्वारे मान उंचावली आहे. तालुक्यापासून अगदी गावात जि.प. शाळेत विविध भौतिक सुविधा उपलब्ध असून, विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकारी आर.एल. मांढरे, विषयतज्ज्ञ सत्यवान शहारे यांच्या मार्गदर्शनातून केले जात आहे. या आकाशवाणीवर येण्याकरिता प्रयत्न जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे, पदवीधर शिक्षक सु. मो. भैसारे, विषयशिक्षक पुरुषोत्तम गहाणे, मोहन नाईक तसेच ‘प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा समनव्यक अविनाश चतुरकर व भूषण निशाणे यांनी सहकार्य केले. मोरगावचे सरपंच उईके, केंद्रप्रमुख मनोहर हुकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, तानाजी लोदी, वामन घरतकर, प्राची कागणे-ठाकूर, अचला कापगते-झोडे, जितेंद्र ठवकर व ग्रामस्थांनी भावेशचे काैतुक केले आहे.