विकास कामांचे भूमिपूजन व गॅस कनेक्शन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:27 AM2018-08-15T01:27:31+5:302018-08-15T01:27:53+5:30
ग्राम दतोरा येथे १६ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत गावातील लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्राम दतोरा येथे १६ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत गावातील लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिचंद कावळे, सुरजलाल महारवाडे, रमेश अंबुले, लता दोनोडे, बंटी भेलावे, मिथून पटले, उर्मिला महारवाडे, भोजराज चुटे, अनिता शिवणकर, रामदास गणवीर, सुरेश चुटे, प्रतिमा कांबळे, सवीता कावळे, सुरेखा डोंगरे, छाया चुटे, छाया शिवणकर, विजय पाथोडे, ब्रिजलाल महारवाडे, एम.डी.तुरकर, शिवशंकर हेमणे, भुमेश चौरे, अनंतराम पाथोडे, गणपत महारवाडे यांच्यासह मोठ्या संख्येत काँगे्रेस पक्षाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.