सिरेगावबांधात बिबटची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:04 AM2019-08-08T00:04:20+5:302019-08-08T00:04:39+5:30

तालुक्यातील ग्राम सिरेगावबांध येथे बिबटची दहशत असून त्याने अनेक पशूंची शिकार केल्याचे गावकरी सांगतात. वनविभागाला याची सूचना देऊनही सीमावादाच्या कारणावरून चालढकल केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.

Bibat Terror in Serengaon | सिरेगावबांधात बिबटची दहशत

सिरेगावबांधात बिबटची दहशत

Next
ठळक मुद्देपशूंची केली शिकार : वनविभागाची चालढकल

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील ग्राम सिरेगावबांध येथे बिबटची दहशत असून त्याने अनेक पशूंची शिकार केल्याचे गावकरी सांगतात. वनविभागाला याची सूचना देऊनही सीमावादाच्या कारणावरून चालढकल केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
सिरेगावबांध येथे गेल्या महिन्याभरापासून बिबटची दहशत आहे. सिरेगावबांध नजीकच्या जंगलाला लागून नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आहे. २८ मे च्या रात्री गावातील मोतीराम हातझाडे यांचा वासरू, काही दिवसानंतर बाळकृष्ण कापगते यांचे दोन बकरे, प्रभू मरसकोल्हे यांचा पाळीव कुत्रा व ५ आॅगस्टच्या रात्री कृष्णा सुखदेवे यांच्या गोठ्यात बांधलेला बकरा बिबट्याने फस्त केला. गावातील असंख्य कोंबड्यांची शिकार केल्याचे गावकरी सांगतात.
सिरेगावबांध येथील विद्यार्थी सानगडी येथे शिकायला जातात. त्यांनी भिवाखिडकी ते सानगडी या ८ किमी. च्या परिसरात भरिदवसा रस्त्याच्या कडेला एकापेक्षा अधिक बिबट समूहाने असल्याचे बघितले आहे.
सिरेगाव हा गोंदिया जिल्ह्याच्या महसूल मंडळात येतो. तर वनक्षेत्र हा भंडारा जिल्ह्यात येतो. सरपंच दादा संग्रामे व गावकऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या वन व महसूल विभागाकडे तक्र ारी केल्या. दोन्ही जिल्ह्यांचे अधिकारी हा क्षेत्र आमच्या जिल्ह्यात येत नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सीमावादाच्या चक्र व्यूहात अडकलेल्या गावकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी याच परिसरात मीराबाई शामराव बहेकार (गुढरी) या महिलेला २८ डिसेंबर २०१२ रोजी व भाग्यश्री रामकृष्ण नेवारे (भिवाखिडकी) या बालिकेला ४ जानेवारी २०१३ रोजी मादी बिबटने ठार करून फस्त केले होते.
घटनेमुळे उद्विग्न झालेल्या जमावाने तहसीलदारांच्या वाहनांचे काच फोडून संताप व्यक्त केला होता. पुन्हा सुरू असलेल्या बिबटच्या धुमाकुळामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. वन व महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.

Web Title: Bibat Terror in Serengaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.