गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप व पालक सभा
By Admin | Published: August 14, 2014 11:48 PM2014-08-14T23:48:19+5:302014-08-14T23:48:19+5:30
शालेय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत शिक्षक-विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सक्रीय सहभाग असावा, यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय इटखेडा येथे शिक्षक
इटखेडा : शालेय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत शिक्षक-विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सक्रीय सहभाग असावा, यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय इटखेडा येथे शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप झाले.
सभेच्या अध्यक्षस्थानी देवानंद वासनिक (माहुरकुडा) होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भागवत पाटील नाकाडे, संस्थेच्या सचिव चंद्रकला शेंडे, माजी सरपंच इंद्रदास झिलपे, ज्ञानेश्वर सोनवाने, प्राचार्य विश्वनाथ डांगे उपस्थित होते. प्रारंभी देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलनाने सभेची सुरूवात करण्यत आली. सभेचा उद्देश जयप्रकाश करंजेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विषद केला. अतिथींचे स्वागत प्राचार्य विश्वनाथ डांगे, यशवंत फुंडे, जयप्रकाश मेश्राम, देवराम चांदेवार, डोंगरवार, आदे, भाकरे, आकरे, चेतन शेंडे, पुष्पा फुंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केले.
शैक्षणिक सत्रामध्ये शालेय अभ्यासासोबत शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सहशालेय उपक्रमामध्ये विद्यार्थ्यानी हिरीरीने आपला सहभाग नोंदवावा व शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती पालकांना व्हावी, यासठी शिक्षक-पालक सभेचे अयोजन केले जाते. यावेळी शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरजू विद्यार्थीनींना सायकलीचे वाटप करण्यात आले. इयत्ता ५ ते ७ वी साठी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान व इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यासाठी आम आदमी विमा योजना योजना या सोबत शालेय उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित पालकांनी चर्चेमध्ये आपला सहभाग नोंदवित विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत आपल्या शंका व व मते मांडले.
याप्रसंगी शैक्षणिक सत्र २०१४-१५ साठी शिक्षक-पालक संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष प्राचार्य विश्वनाथ डांगे, उपाध्यक्ष देवानंद वासनिक, सचिव जयप्रकाश करंजेकर, सहसचिव दुर्गा कुंभरे, सदस्य ईश्वर डोर्लीकर व शंकर धांडे हे विद्यार्थीे प्रतिनिधी म्हणून घोषीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मोतीलाल शेंडे यांनी तर आभार प्रा. खुशाल पेशने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)