मोठे स्वप्न बघूनच ध्येय गाठता येते!
By admin | Published: February 15, 2017 01:57 AM2017-02-15T01:57:36+5:302017-02-15T01:57:36+5:30
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग आपल्या मुठीत आलेले आहे. उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग आपण कसे करतो,
किशोर तरोणे : वार्षिकोत्सव साजरा
नवेगावबांध : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग आपल्या मुठीत आलेले आहे. उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग आपण कसे करतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग स्वत:च्या क्षमता व कौशल्य विकसित करण्यासाठी करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवन हे स्वप्नवत असते. प्रत्येक विद्यार्थी विविध स्वप्ने बघतो. परंतु भविष्याचे मोठे स्वप्न बघता-बघता त्याला प्रयत्नांची जोड दिली की आपल्याला स्वत:चे ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी केले.
स्थानिक आर.पी. पुगलिया महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आ. दयाराम कापगते होते. अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष नितीन पुगलिया, सदस्य अमृतलाल टांक, जगदिश मोहबंशी, जगदिश पवार, विद्यापीठ प्रतिनिधी कमलेश चव्हारे, विद्यार्थिनी प्रतिनिधी शीतल शहारे, प्रा. माया लाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धामध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन स्वत:मध्ये नवचैतन्य निर्माण करावे, असे आवाहन दयाराम कापगते यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
प्रास्ताविक प्राचार्य मंगला गडकरी, संचालन प्रा. विमला आगाशे व सचिन राऊत, आभार प्रा.आर.सी. तागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. जनार्धन मेश्राम, टी.जी. चांदेवार, डोंगरवार, रामदास बोरकर, हेमकृष्ण लंजे, पुंडलिक मेश्राम, संतोष राठोड, वामन चचाणे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)