विद्यार्थ्यांनी राबविली बीजगोळे संकलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 09:46 PM2018-04-21T21:46:04+5:302018-04-21T21:46:04+5:30

आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग ५ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत पाच हजार बीजगोळे संकलनाची मोहीम राबविली. फिरते शाळेतील पक्षीमित्र शिक्षक जैपाल ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘बीजगोळे संकलन’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

 Bijelogalo compilation campaign implemented by the students | विद्यार्थ्यांनी राबविली बीजगोळे संकलन मोहीम

विद्यार्थ्यांनी राबविली बीजगोळे संकलन मोहीम

Next
ठळक मुद्दे पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार : पावसाळ्यात टाकले जाणार बीजगोळे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग ५ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत पाच हजार बीजगोळे संकलनाची मोहीम राबविली. फिरते शाळेतील पक्षीमित्र शिक्षक जैपाल ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘बीजगोळे संकलन’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
बिरसी शाळेच्या विद्यार्थ्यांनी करंजी, चिच, गुंजा, पळस, बांभूळ, कडूनिंब व इतर झाडाचे बीज संकलन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी माती आणून बी टाकले व उन्हात वाळवून ते लाडू शाळेत घेऊन आले. सर्वात जास्त कोण लाडू बनवेल? याविषयी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा झाली. आणि यातूनच बीजगोळ््यांची संख्या वाढली अन वेगळाच आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चाललाय. आपण वेळीच साधव झालो नाही तर आपल्याला प्रत्येक संकटाला तोंड दयावे लागेल. वृक्षकटाई, वाढते प्रदुषण यामुळे पर्यावरणाचे असंतुलन होऊन पूर, वादळे, भूकंप, वाढते तापमान व अनारोग्य यासारख्या समस्या आवासून उभ्या होत आहेत. अशावेळी ‘झाडे लावा- माणूस व सृष्टी वाचवा’ जर यशस्वी करायचे असेल तर शालेय जीवनातच विद्यार्थीदशेत योग्य संस्कार टिकविले तर ते चिरकाल टिकतील आणि झाडाचे महत्व व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजेल.
आपण पर्यावरणातही काय करु शकतो? आपल्या काहीतरी देणं आहे. या भावनेने विद्यार्थी प्रेरित होवून विद्यार्थ्यांनी बीजगोळे संकलन केले. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीजगोळे योग्य ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा, कालव्याच्या काठावर टाकले जाणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाचा कोणताही खर्च न होता पर्यावरणाच्या रक्षणासाठी निश्चितच हातभार लागेल असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक एल.यू.खोब्रागडे यांनी व्यक्त केला. सदर उपक्रमम यशस्वी करण्यासाठी विकास लंजे, वर्षा बावनथडे व सोना रहांगडाले यांनी सहकार्य केले.
 

Web Title:  Bijelogalo compilation campaign implemented by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.